Maryada Yog


अन्न , प्राण व मन हि परमात्म्याने मानवाला दिलेली तीन सुंदर साधने आहेत. व बुद्धी म्हणजेच हि साधने वापरण्याचे तंत्र,आणि ह्या तंत्राला उचित कौशल्यात रुपांतरीत करतो तो “मर्यादा- योग”.

शरीर , प्राण व मन ह्या तीन साधनांना समर्थ व सक्षम ठेवण्यासाठी मानवी देहातील सप्त चक्रांपैकी मूलाधार चक्राच्या चारही दलांची उपासना अत्यंत आवश्यक आहे.

मूलाधार चक्राच्या ह्या चार पाकळ्या म्हणजेच आहार, विहार, आचार, आणि विचार .

१) आहार : आपले व्यक्तिमत्व समर्थ व तृप्त बनवण्यासाठी प्रथम आपल्या आहारात आवश्यक ते बदल घडवावे लागतात. श्रीमद्पुरुषार्थ ग्रंथराज मध्ये नित्य वापरातील अन्न द्रव्याच्या भावशारीरी गुणांचे विस्तृत वर्णन दिले आहे.

आहार ह्या दलाची उपासना कशी करावी ?

 • जेवणापूर्वी व जेवणानंतर आपल्या इष्ट देवतेचे स्मरण करावे.
 • गरजूस अन्नदान करावे .( इथे गरजू व्यक्ती प्रथम ओळखणे महत्वाचे.)
 • आहार म्हणजे केवळ अन्नग्रहण नव्हे, तर सर्व इद्रीयांनी मनाला जे जे काही पुरविले जाते, ते ते सर्व आहारच होय.

२) आचार : एखादे ध्येय ठरविले, एखादा विचार निश्चित केला कि, त्यानुसार त्या ध्येयाच्या प्राप्तीसाठी करावयाचे परिश्रम म्हणजे ” आचरण “.

आचरणाचे प्रमुख पाच विभाग आहेत :

 • आप्तस्वकीयांशी
 • इतरांशी ( स्वधर्मी / परधर्मी )
 • शत्रूशी
 • देवाशी
 • स्वतःशी

मनुष्याचे आचरण ठरवते, ते त्याचे मन.

त्या मनाला दिशा देण्याचे प्रयत्न करते, ती त्याची बुद्धी.
आणि ह्या मनात सातत्त्याने परमेश्वराच्या सत्य, प्रेम, आणि आनंद ह्या नियमांची स्थापना करते ते ” परमेश्वरी मन “.
जेव्हा मानवाच्या काम व क्रोध ह्या दोन मुलभूत प्रवृत्ती नीतीची व धर्माची मर्यादा ओलांडतात, तेव्हाच मनुष्याच्या संचितात पापाची भर पडु लागते.

अश्यावेळी फक्त मर्यादामार्गच प्रारब्धाशी युद्ध करू इच्छीणाऱ्या प्रत्येकास बळ, दिशा, साधनसामुग्री, कवच, संरक्षण व सरते शेवटी निश्चीत यशाची खात्री देतो.

म्हणूनच सामान्य मानवाचे ‘ पशुमय अस्तित्व’ व ह्या विश्वातीत परमेश्वराचे ” सच्चिदानंद अस्तित्व” ह्यांच्यामधील हा प्राणांच्या (रामनाम लिहिलेल्या) पाषाणांनी व मनाच्या सिमेंटने बांधला जाणारा सेतू उचित प्रकारे बांधणे, हेच वानर सेनेचे प्रमुख कार्य आहे.
 • कर्म कसे असावे ?

मर्यादा मार्ग कर्म विजयाची नऊ सूत्रे मानतो —

 • फलाशेचा पूर्णविराम
 • ईश्वरार्पण कर्म
 • निरीक्षण प्राधान्य व अभ्यास
 • आपली स्वतःची ओळख ( Aims & Objectives )
 • विनियोग व काळाचे भान
 • उचित क्रमाने प्राधान्यता
 • सिंहावलोकन
 • कुठे थांबायचे व कुठे गतिमान व्हावयाचे ह्याची जाण (Balance bet’n Gati & Sthiti)
 • विश्राम ( Resting zones ).

३) विचार :   मानवाचे जीवन घडते ते त्याच्या विचारांनी व त्याचे विचार घडतात ते त्याच्या विहाराने .
आशा, अपेक्षा, भय, योजना, कल्पना, निश्चय ही सर्व विचारांचीच रूपे आहेत.

विचार हा उचित कृतीत परिवर्तीत करता यायला हवा. 
विचार शक्तीचा जर पूर्ण फायदा करून घ्यायचा असेल तर त्यासाठी आवश्यक असते ती
“सम्यक दृष्टी “.
” सम्यक दृष्टी ” म्हणजे स्वतःच्या विचारांना नि:पक्षपातीपणे पाहण्याची शक्ती.

आणि ” सम्यक दृष्टी ” मानवाला नीतीयुक्त भक्तीच्या म्हणजेच मर्यादा मार्गाच्या पालनानेच मिळू शकते.

४) विहार :   विहार म्हणजे फिरणे, भटकणे, प्रवास, स्थानांतर ( शरीराचे आणि मनाचेही ) .
मर्यादा मार्गीयांचा विहार म्हणजे भौतिक शरीर, मनोमय शरीर, व प्राणमय शरीर ह्यांची बुद्धीच्या साहाय्याने भगवंतावर दृढ विश्वास ठेवून केलेली ह्या तीनही शरीराची प्रत्येक हालचाल होय.

असा विहार साधायला मला काय करायला हवे ?

 • रोज कमीत कमी दोन घटिका (48 min) चालण्याचा व्यायाम करणे अत्यावशक व चालताना मनामध्ये मंत्रजप अथवा गजर करत राहावा.
 • देवदर्शन करण्यासाठी मंदिरात जाणे, व त्या पवित्र स्थळी नामस्मरण करणे.
 • निखळ व शुद्धतेने परिपूर्ण निसर्ग सान्निध्याचा आनंद लुटणे.
 • सामुहिक उपासनेस जाणे हा सुद्धा एक अत्यंत महत्वाचा विहार आहे. सामुहिक उपासनेमुळे निर्माण होणारी स्पंदने अधिक जोरदार व अधिक शुद्ध असतात.
 • आध्यात्मिक ग्रंथाचे वाचन हा ही एक सुंदर विहाराच आहे. ” श्रीमद पुरुषार्थाचे ” वाचन व अभ्यास हा सर्व विहारांतील अत्यंत श्रेष्ठ विहार आहे.

एकांत व मौन हा देखील सर्व दृष्टींनी व सर्व बाजूंनी परिपूर्ण असा विहार आहे.
हा एकांत म्हणजेच “त्या” एकाच्या, “त्या” परमकृपाळू परमात्म्याच्या मनोमय संगतीत राहणे. कारण मी येतानाही एकटाच असतो आणि जातानाही एकटाच .आणि त्या एकांतात माझ्या बरोबर असते ते मी केलेले प्रेम, भक्ती, आणि कर्माचे गाठोडे व मार्गावर प्रकाश असतो फक्त “त्या” एकाचा व आधारही फक्त “त्या” चाच .

                     ||  श्रीमद पुरुषार्थ: सदा विजयते ||

                                          श्रीमद पुरुषार्थ ग्रंथराज (प्रेमप्रवास)

Advertisements

One comment

 1. Hari Om!

  Atishay Sundar, Malahi asach lihavasa vatat hota. Pan me net var asankhya blogs baghitale aahet.

  Mala ek suggestion dyavasa vatat – Font cha red color is not readable. Use light colors (The light green, white looking good)

  Like

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s