अचिन्त्यदाता


हे जे हृदय आपुले || चौफाळूनि या भले || 
वरी बैसवू पाऊले || सदगुरुंची ||

                 सद्गुरूच फक्त आम्ही जसे आहोत तसे आम्हाला स्वीकारून आमच्या जीवनातील अंधाराचे रुपांतर प्रकाशात करत असतो. जो पर्यंत मी सद्गुरूस पूर्णपणे शरण जात नाही तोपर्यंत त्याचे वात्स्यल्य,क्रियाशिलत्व मला अनुभवता येत नाही .

” एक भाव असावा पुरता कर्ता हर्ता गुरु ऐसा “

           ह्या उक्तीची महती आज बापूंकडे आल्यावर समजत आहे . जीवनातील प्रत्येक क्रियांमागील मर्म, कारण मीमांसा प.पू.बापू आपल्या प्रवचनामधून , अग्रलेखांमधून अगदी सहजपणे समजावून सांगतात.

             ” तुम्ही मला कसेही स्वीकारा मी तुम्हाला कधीच टाकणार नाही “ हे प.पू. बापूंचे वचन प्रत्येक श्रद्धावानाच्या जीवनात निर्भयता आणते .

       सदगुरू श्री अनिरुद्धांनी आपल्याला प्रेम, आनंद, आधार दिला, निर्भयता दिली. बापूंचे प्रेम स्वीकारून तेच आज  बापूंना अर्पण करूया .

  1.       विश्वातील सर्वश्रेष्ठ गुरुमंत्र  (गुरूक्षेत्रम मंत्र ) आपल्याला दिला .त्या मंत्रात सर्व मंत्र समाविष्ठ आहेत . ह्या मंत्रामुळे मला माझ्या आदीमातेचे सदगुरूतत्वाचे  कधी विस्मरण होत नाही .
  2.        विश्वातील सर्वश्रेष्ठ ग्रंथसंपदा आपल्याला सदगुरू श्री अनिरुद्धांनी दिली. श्रीमद पुरुषार्थ ग्रंथराजाचे तीन खंड सत्य स्मृती , प्रेम प्रवास , आनंद साधना ज्यात  श्रद्धावानांच्या जीवनाचा  उद्धार घडवून आणण्याचे सामर्थ्य आहे . ग्रथराजातील प्रत्येक अक्षर ,प्रत्येक शब्द आणि त्या शब्दांनी बनलेले प्रत्येक वाक्य श्रद्धावानासाठी अनिरुद्धांची अभेद्य शक्ती म्हणून उभी राहते . या सोबत बापूंनी राम रसायन, मातृवात्स्यल्य, ही ग्रंथ संपदा देवून प्रत्यक्ष आदिमातेशी व सदगुरू तत्वाशी प्रेमाचे नाते जोडून दिले आहे.
  3.        सदगुरू श्री अनिरुद्धांनी रामनाम वही दिली. रामनाम वही म्हणजे जन्म जन्मान्तरासाठी सदगुरू कृपेची मिळणारी महापर्वणी. माझ्या दुष्प्रारब्ध नाशासाठी सदगुरू श्री अनिरुद्धांनी श्रद्धावानासाठी केलेला महान संकल्प. रामनाम वही जीवनात उतरविणे म्हणजे अध:कारचा नाश व प्रकाशाचे आगमन .
  4.       अनिरुद्धांनी त्यांच्या स्वतःच्या आचरणातून जीवनात कसे जगावे त्याचे प्रात्यक्षिक करून दाखविले.
  5.     श्री हरी गुरुग्राम येथील प्रवचने म्हणजे पुरुषार्थ प्राप्तीची महाभंडारे. प्रपंच व परमार्थ साधून घेण्यासाठी श्री अनिरुद्धांकडून सद्गुरुकृपेचे प्राप्त झालेले महान रसायन .
  6.      प्रत्यक्ष दैनिकातून  श्रद्धावानाच्या घरी येवून भेटणारा अनिरुद्ध म्हणजे श्रद्धावानांसाठी नित्य दीपावली. अनिरुद्धांचे अग्रलेख म्हणजे श्रद्धावानांसाठी प्राप्त झालेला नित्य प्रकाश अर्थात प्रपंच व परमार्थ प्राप्तीसाठी श्रद्धावानांना प्राप्त झालेला अक्षय खजिना.
  7.      श्री अनिरुद्ध गुरूक्षेत्रम म्हणजे पापाची निवृत्ती करणारे, पुण्याची वृद्धी करणारे , श्रद्धावानांना पुरुषार्थी बनवणारे  विश्वातील एकमेव व अद्वितीय तीर्थक्षेत्र. सदगुरू श्री अनिरुद्धांच्या संकल्प शक्तीतून प्रगटलेला एकमेव व अद्वितीय अश्या  त्रिविक्रमाचे दर्शन घडते ते ह्याच तीर्थाक्षेत्रामध्ये.
               जसा माझा भाव तशी प्रचीती.. एखाद्या आजारातून बरे होण्यासाठी जसे मी डॉक्टर वर पूर्ण विश्वास ठेवून औषध घेतले तरच माझा आजार बरा होऊ शकतो, मी तिथे शंका – कुशंका घेवून टाळाटाळ केली तर माझा आजार वाढून त्रासच निर्माण होईल…तसेच खऱ्या सद्गुरुकडे जाताना माझ्या मनातल्या शंका – कुशंका माझाच घात करण्यास कारणीभूत ठरतात.

        माझ्या जीवनात जर प्रत्येक क्षण आनंदात व समाधानात जावा असे वाटत असेल, आपल्याला सुखी समाधानी समाज निर्माण करायचा असेल तर प्रत्येकाने भगवंताच्या अस्तित्वाचा नेमका कसा व कश्यासाठी उपयोग करून घ्यायचा हे  सदगुरू श्री अनिरुद्धांनी ग्रंथराज मध्ये सागितले आहे .
१) आम्हाला आरोग्य हवे आहे , परमेश्वर प्राणदाता आहे ,आम्ही प्राणायाम करू .
२) आम्हाला संपूर्ण कुटुंबाचे क्षेम हवे आहे , परमेश्वर प्रेमदाता आहे आम्ही एकत्र येऊन प्रार्थना करू .
3) आम्हाला वैभव हवे आहे .परमेश्वर निश्चयाचे बळ देणारा आहे आम्ही परमेश्वराच्या नामस्मरणाचा निश्चय करू .
४ ) आम्हाला संकटांवर विजय मिळवायचा आहे , आम्ही प्रथम परमेश्वराचे ध्यान करू .
५ ) आम्हाला पापांचा नाश करायचा आहे. आम्ही परमेश्वराकडे सर्व चुकांची कबुली देवून ,परमेश्वराच्या लेकरांची सेवा करू .
६ ) आम्हाला शत्रूंचा नाश करायचा आहे, आम्ही सूर्यनमस्कार घालू .
७) आम्हाला शांती हवी आहे, आम्ही रामनाम रोज घेवू , रामाप्रमाणे चालू व उद्याचे नियोजन करू .
८) आम्हाला समाधान हवे आहे, आम्ही दत्तगुरूंची,चंडिका आईची प्रार्थना करू व सदगुरू पादुकांचे पूजन करू .
९) आम्हाला परमेश्वर हवा आहे , तो माझा चालक व प्रेरक आहे ह्याची जाणीव ठेवून आम्ही त्याच्या वर अमर्याद प्रेम करू .
                 प्रत्येकाला भयमुक्ती देणारा प्रत्येकाचा तो मित्र ,प्रत्येक मानवाचा विकास घडविण्यासाठी, प्रत्येकाच्या जीवनात रामराज्य स्थापन व्हावे, यासाठी आज अनिरुद्ध रूपाने आला आहे .
                  तो सदगुरू सर्वांना कडेवर घेण्यासाठी, जन्म- मृत्यूच्या दुष्ठ चक्रातून सोडवण्यासाठी तत्परच आहे. मला फक्त त्याचा मर्यादामार्गी वानरसैनिक बनायचे आहे .

मला जर चैतन्यमय जीवन जगायचे असेल तर मला हे चैतन्य स्वीकारायलाच हवे.

              सदगुरू श्री अनिरुद्धांच्या प्रेमाचा अखंड स्त्रोत म्हणजे प्रकाश तत्वाचा विजय  व अध:काराचा पराजय अर्थात …”अनिरुद्ध सदा विजयते”

” मी यत्न करीता मज उध्दारासाठी
उभे घेऊनि बापू दूधाची वाटी
किती बापू भक्तार्थ करीती अटाटी
भक्तवत्सला तुज मी शरण आलो

अनिरुध्दा तुझा मी किती ऋणी झालो “

One comment

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s