Shree Maghi Ganapati Utsav 2011


                श्री अनिरुद्ध उपासना फौन्डेशन, भारतीय भाषा संगम आणि श्री अनिरुद्धाज हाउस ऑफ फ्रेंड्स ह्या संस्थांच्या संयुक्त विद्यमाने प्रतिवर्षी प्रमाणे ० फेब्रुवारी २०११ ह्या दिवशी “श्री माघी गणपती उत्सवाचे” आयोजन करण्यात आले आहे.  

                  माघी गणपती उत्सवात  ब्रम्हणस्पतीच्या मूर्तीचे  दर्शन घेण्याचा लाभ मिळतो . ह्या काळात  ब्रम्हणस्पतीच्या मूर्तीवर  ब्रम्हणस्पती सूक्ताच्या पठणाद्वारे अभिषेक केला जातो. हे सुक्त ऋग्वेदातील अत्यंत पवित्र सुक्त आहे. केवळ व्यक्ती वा समाजाचेच नाही तर अवघ्या राष्ट्राचे भले करणारे आहे. राष्ट्राला, प्रत्येक नागरिकाला समर्थ आणि निर्भय करणारे असे हे सुक्त आहे. 

                      ह्या उत्सवात अष्टविनायकांचे पूजन देखील केले जाते.प्रत्येकाला परमेश्वराची ही कृपा  प्राप्त व्हावी, त्यासाठी प्रत्येकाच्या त्रिविध  देहात जी यंत्रणा परमात्मा (सदगुरू) कार्यान्वित करीत असतो ती यंत्रणा म्हणजेच गणपती . 
                     ह्या यंत्रणेची , व्यवस्थेची आठ महत्वाची  केंद्रे प्रत्येकाच्या देहात असतात. ही स्थाने  म्हणजेच अष्टविनायक. म्हणूनच ह्या अष्टविनायकांचा संबंध  भक्ती करताना जागृत होणाऱ्या  अष्ट भावांशी आहे . ही मानवी देहातील आठ तीर्थक्षेत्रे परमेश्वराची कृपा मानवाच्या जीवनात प्रवाहित करीतच असतात.
                    परंतु मानव स्वतःच्या प्रज्ञापराधामुळे, प्रारब्धामुळे ही कृपा स्वीकारण्यात अडथळे म्हणजेच विघ्ने निर्माण करत असतो व त्यामुळेच तो परमेश्वरी कृपेस वंचित होत असतो . त्या परमेश्वरी कृपेस वंचित होऊ नये म्हणून ते मूळ परब्रम्ह दत्तगुरू  श्रद्धावानांच्या समुद्धरासाठी परमात्मा सद्गुरूची योजना करतो.
                       ते सदगुरू तत्त्व श्री अनिरुद्धांच्या रूपाने आज प्राप्त झाले आहे .
            श्रद्धावानांवर लाभेवीण प्रेम करणाऱ्या श्री अनिरुद्धांनी आम्हा श्रद्धावानांना नव अंकुर ऐश्वर्य प्राप्त व्हावीत व त्यासाठी देहातील आठ क्षेत्रे उचितपणे कार्यरत रहावीत म्हणून ह्या माघी गणेशोत्सवाचे आयोजन केले आहे .

              ब्रम्हणस्पतीसह अष्टविनायकांच्या मूर्तींचेही  अर्चन माघी गणपती उत्सवात केले जाते . गणपती अथर्वशिर्षाद्वारे अभिषेकही केला जातो. अश्या प्रकारे ह्या मंगल सोहळयाद्वारे श्रद्धावानांना जीवनाचा विकास करून घेण्याची संधी , एक अभूतपूर्व पर्वणीच सदगुरू श्री अनिरुद्ध कृपेने प्राप्त झाली आहे . 
               माघी गणेश चतुर्थीच्या दिवशी सकाळी “एकदिन साध्य गणेश याग” केला जातो. त्यानंतर दुपारी  चार वाजल्यापासून रात्रो ११ वाजेपर्यंत ‘ गणपती अथर्वशिर्षाचे ” पुरश्चरण केले जाते . सदगुरू श्री अनिरुद्ध बापूंच्या राहत्या घराच्या देव्हाऱ्यातील पूजनाची गणपतीची मूर्ती उत्सव स्थळी  आणली जाते .
त्या मुर्तीवर आठ नद्यांच्या जलाने अभिषेक  केला जातो .
                गणपती उत्सवात तसेच दर मंगळवारी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी सदगुरू श्री अनिरुद्धांच्या आज्ञेने श्रद्धावान खालील मंत्राचा त्या त्या दिवसास ७२ वेळा जप करतात.  
                    (As per Instructions from P.P.Sadguru Shree Aniruddha bapu in Maghi Ganpati Utsav 2010 , please chant the enclosed Jap on any special day of Ganpati and Tuesday 72 times per day.)
|| ॐ श्री ब्रह्मणस्पतये पार्वतीपुत्राय मंगलमुर्तये गणपतये विश्व घनप्राणाय सर्व विघ्न निवारकाय नमो नम: ||

                 माघी गणपती उत्सवामध्ये सर्व भक्त १० फेब्रुवारी २०११ ह्या दिवशी सकाळी १० ते रात्री ९ वाजे पर्यंत दर्शनाचा लाभ घेऊ शकतील .

स्थळ  : उत्तर भारतीय संघ हॉल, टीचर्स कॉलनी , बांद्रा (पू) मुंबई -५१ . 
             (Uttar Bharatiya Sangh hall , 
             College of Science & Commerce,
             Plot no . 629/1243 ,Teachers colony ,Bandra(E).
             from 10 am to 9 pm on 10th feb 2011. )

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s