को नहि जानत है जगत मै कपि..


श्री हनुमान चलिसा पठण म्हणजे श्रध्दावानांसाठी साक्षात कवच. श्री हनुमंत म्हणजेच सेवा, भक्ती, शारण्य,त्याग, पावित्र्य, व पुरुषार्थ अश्या अनंत गुणांच्या श्रेष्ठत्वाची चिरंजीव मूर्ती.
म्हणुनच श्री अनिरुद्ध गुरुक्षेत्रम येथील श्रीमद पुरुषार्थ यंत्राची श्री हनुमंत ही अधिष्ठात्री देवता आहे. सदगुरु श्री अनिरुद्धांच्या पंचगुरुंचे निवास आहे ते ह्याच श्रीमद पुरुषार्थ पुरुषोत्तम यंत्रात.
  • श्री हनुमान चलिसाचे पठण श्रद्धावानांच्या जीवनात कसे कार्यरत होत असते ?
१) श्री हनुमान चलिसाचे १०८ वेळा पठण केल्याने एक वर्षापर्यंत पठण कर्त्याचे कोणत्याही वाईट स्पंदनापासुन रक्षण होते.
२) श्री हनुमान चलिसा पठणा मुळे श्रद्धावानांच्या श्रद्धेचे रुपांतर सबुरीत व सबुरीचे रुपांतर आत्मविश्वासात होण्यास मदत होते.
३) श्री हनुमान चलिसाच्या नित्य पठणामुळे बुद्धीची उचित दिशेने गती होते व उचित विचार करण्याची शक्ती वाढते. आपल्या मनास उचित शिस्त लावण्याचे काम हनुमंत करतो. म्हणुन दिवसातुन तीन वेळा श्री हनुमान चलिसा पठण अत्यंत फलदायी असते. कारण मनाचे चित्तात रुपांतर करतो तो हनुमंतच .
४) जिथे महावीर हनुमंताचे नाम घेतले जाते तिथे भूत पिशाच्च जवळही येऊ शकत नाही.

५) जो श्री हनुमान चलिसाचे पठण करतो त्यास श्री रामांचे दास्य व सख्यत्व प्राप्त होते असे साक्षात गौरीपती शिवाचे अभिवचन आहे.

६) संत तुलसीदासजी श्री हनुमंताना ह्या स्तोत्राद्वारे प्रार्थना करतात की, हे पवनसुता मारुतीराया, तु संकटांचे हरण करणारा , साक्षात मंगलमूर्ती आहेस. तु देवांचे , सदगुरुंचे व मानवांचे ही रक्षण करणारा रक्षक गुरु आहेस.
          हे महाबला, पवन कुमारा , मी बुद्धीहीन आहे असे जाणुन तु मला उत्तम बळ , उचित बुद्धी, व विद्या प्रदान करुन माझे क्लेश व विकार ह्यांचा नाश कर. तसेच माझी तुला प्रार्थना आहे की, राम , लक्ष्मण व सीतेसहित तु माझ्या हृदयात निवास कर.
             सदगुरू कडुन मला प्राप्त होणारा जो उर्जेचा स्त्रोत आहे तो मायेमुळे बांधला जातो. त्याला मुक्त करण्याचे काम हनुमंत करतो . माझी ताकत कमी पडते कारण माझी शक्ती बांधली गेलेली आहे. त्या शक्तीला मुक्त करण्याचे काम हनुमंत करतो त्या हनुमंताची भक्ती माझा सदगुरू भक्तीचा मार्ग मोकळा करुन भक्तीमार्गात पदोपदी मदत करते . – (संदर्भ श्री अनिरुद्ध गुरुक्षेत्रम पत्रिका.)

           श्री अनिरुद्ध गुरुक्षेत्रम येथे श्रीमद पुरुषार्थ यंत्राचा उत्सव म्हणुन दरवर्षी हनुमान चलिसाचे पठण एक सप्ताह केले जाते. ह्यावर्षी प.पू. बापूंनी हनुमान चलिसाचे पठण अत्यंत पवित्र अश्या श्रावण महिन्यात करण्याची संधी सर्व श्रद्धावानांना दिली आहे.
          दिनांक १५-०८-२०११ ते २१-०८-२०११ ह्या दिवसांत श्री अनिरुद्ध गुरुक्षेत्रम, खार(प.), मुंबई येथे सकाळी ८.०० ते रात्री ८.०० ह्या वेळेत हनुमान चलिसाचे पठण चालू आहे.
        सदगुरू कृपेने ह्या मंगलदायी श्री हनुमान चलिसा पठणात कालच पुर्ण दिवस सहभागी होण्याचे संधी मिळाली. व पठणानंतर प.पू.बापूंनी सर्व उपस्थित श्रध्दावानांकडुन सुंदर गजरही करुन घेतला.
         श्रध्दावानांनो, श्री हनुमान चलिसाचे महात्म्य लक्षात घेऊन श्री अनिरुद्ध गुरुक्षेत्रम येथे संपन्न होणाऱ्या श्री हनुमान चलिसाच्या पठणात सहभागी होऊन आपण प्रत्येक जण श्री सदगुरू कृपेचे कवच प्राप्त करुया.

हरी ॐ 

One comment

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s