रक्तदान म्हणजेच जीवनदान.


                                                         
           ” परमात्म्यास नऊ प्रकारचे थेंब अत्यंत आवडतात, त्यापैकी एक – एका श्रद्धावन्ताने दुसऱ्या श्रद्धावन्तासाठी निरपेक्ष भावनेने केलेल्या रक्तदानाचे थेंब.” – प.पू.आनिरुद्ध बापू.
 रक्तदान हे सर्वात श्रेष्ठ दान समजले जाते. हे आपल्या सर्वांनाच ठाऊक आहे. मात्र, भीतीपोटी म्हणा अथवा कोणत्यातरी गैर समजुतीमुळे म्हणा. आपण रक्तदानासाठी जात नाही.
 आजच्या काळात वाढते अपघात आणि इतर आजारांमुळे रक्ताची मागणीही वाढते आहे. स्वेच्छा रक्तदानाचे प्रमाण वाढत असले तरी त्यात अनियमितता आढळून येते. त्यामुळे नातेवाईकांना रक्तासाठी धावपळ करावी लागते. यासाठीच रक्तदान नियमित होणे आवश्यक आहे. 
 खरंतर कुठलीही निरोगी व्यक्ती वर्षातून चार वेळा रक्तदान सहज करु शकते, ह्याचाच अर्थ वर्षातून चार वेळा आपल्याला चार जणांचं आयुष्य बळकट करण्याची , त्यांना जीवन दान देण्याची संधी मिळते.

 रक्तदान हे दान जगातील कोणत्याही जाती-धर्माच्या लोकांना जोडण्याचे आणि माणूस म्हणून एक वेगळी ओळख निर्माण करण्याचे काम करते.तरीही रक्तदानाबाबतीत मात्र समाजात अजुनही फार गैरसमज व उदासीनता जाणवते. रक्तदानाविषयी आपल्या मनातील भीती किंवा भ्रम पूर्णपणे अनाठायी आहे. कारण शरीरातल्या एकूण रक्ताच्या फक्त पाच टक्के रक्त काढले जाते.
 रक्तदान – गैरसमज :

१) रक्तदान केल्याने अशक्तपणा येतो …रक्तदान केल्याने कधीही अशक्तपणा येत नाही . कारण आपल्या शरीरातील ५ लीटर रक्तापैकी केवळ ३५० मिलि रक्तच काढले जाते .व हे रक्त काही तासातच भरून निघते .
२) रक्तदान केल्याने एड्स अथवा अन्य सांसर्गिक रोग होण्याची संभावना असते –  जेव्हा आपण सरकारी रक्तपेढ्यांमध्ये रक्तदान करतो तेव्हा तिथे आरोग्याच्या सुरक्षितेसाठी आवश्यक सर्व रक्ताच्या चाचण्या तसेच वापरण्यात येण्यार्या उपकरणांबाबत योग्य काळजी घेतली जाते.त्यामुळे  रक्तदान केल्याने एड्स अथवा अन्य सांसर्गिक रोग होण्याची संभावना नसते. सरकारी रक्तपेढ्यांमध्ये वापरात येणारी जी उपकरणे आहेत ती पुर्णत: निर्जंतुक केलेली असतात .
नेहमी रक्ताची नाती अधिक घट्ट असतात असं म्हटलं जातं.ऎच्छीक रक्तदानामुळे अगदी अनोळखी अशा एखाद्या व्यक्तीशी देखील आपण रक्ताचं नातं जोडू शकतो.  रक्तदानामुळे एखादा जीव वाचवण्याचं पुण्य तसेच रक्ताची आवश्यकता असणार्या रुग्णाच्या नातेवाईकांच्या सदिच्छा नक्कीच प्रत्येकाला लाभू शकतात, यात शंका नाही.
  •  मानवाला रक्त देण्याची गरज कधी भासते ?
१) कधीकधी अचानक रक्तस्राव होतो. शस्त्रक्रिया, बाळंतपणातील अतिरक्तस्राव,अश्या प्रसंगात रुग्णाला रक्त देण्याची गरज निर्माण होते.
२) रक्ताचा कर्करोग, अपघातात होणारा रक्तस्राव, इत्यादी प्रसंगीही रक्त द्यावे लागते.
३) एखादा आटोक्यात न येणारा जंतुदोषही योग्यायोग्यविचार करून रक्त दिल्यावर आटोक्यात येऊ शकतो.
४) हिमोफिलिया व थॅलसीमिया या रक्ता संबधी असणार्या आजारात वारंवार रक्त द्यावे लागते.
  • रक्तदान कोण करु शकते ?
१) 18 ते 60 वर्षांची कोणतीही निरोगी व्यक्ती रक्तदान करू शकते. 
२) यासाठी व्यक्तीचं वजन कमीत कमी 45 किलो असणं आवश्यक आहे.
३) रक्तदान करण्यासाठी रक्तातल्या हिमोग्लोबीनचं प्रमाणही महत्त्वाचं मानलं जातं. रक्तदानासाठी हिमोग्लोबीनचं प्रमाण साधारणपणे 12.5 असायलाच हवं.  

  • रक्तदानाचा  कसा फायदा होतो ?
सुदृढ आरोग्यासाठी रक्तदान करणे फायदेशीरच आहे.कारण आपल्या शरिरात ४.५ – ५ लिटर रक्त असते. यापैकी केवळ ३०० मिली रक्त घेतले जाते. रक्तदानानंतर २ ते ३ तासात शरिरात नविन रक्तपेशी तयार होतात. म्हणजेच काय रक्तदानामुळे नवीन रक्तपेशी तयार होण्यास वाव मिळतो आणि त्यामुळे आपले आरोग्य सुदृढ राहते.
  •  आपण रक्तदान केल्यानंतर त्यावर कुठली प्रक्रिया केली जाते ? 
रक्तदानानंतर त्यातले काही रक्त घटक वेगळे केले जातात. काही रुग्णांना पूर्ण रक्त देण्याऐवजी विशिष्ट घटक द्यावे लागतात. याला इंग्रजीत कंपोनंटस् असे नाव आहे. ह्यासाठी पुढीलप्रमाणे घटक वेगळे केले जातात. – तांबडया रक्तपेशी, पांढ-या पेशी, प्लाझ्मा, प्लेटलेट्स (रक्तकणिका) . हे घटक आवश्यकतेनुसार रुग्णांना दिले जातात. 
 दर वर्षी होण्यार्या आपल्या संस्थेच्या रक्तदान शिबिरात जमा होणारे रक्त हे सरकारी रक्त पेढ्यांमध्ये जमा होते व तिथून ते योग्य प्रक्रिया होऊन गरजु रुग्णांपर्यंत पोचते.
आपल्या लाडक्या सद्गुरुंनी ,प.पू.बापुंनी आपणा सर्वांना जणु ह्या शिबिराच्या माध्यमातुन आपल्याला गरजु व्यक्तीला जीवन दान करण्याची एक सुवर्ण संधीच दिली आहे. 
ह्या सुवर्ण संधीचा फायदा आपण सर्व श्रद्धावानांनी घेऊया व श्री अनिरुद्धांच्या वानर सेनेतील रक्तदाता बनुया..८ एप्रिल २०१२ ह्या दिवशी नातेवाईकांसोबत तसेच मित्र परिवारासोबत रक्तदान करण्याची सुवर्ण संधी चुकवु नका.

स्थळ : श्री हरी गुरु ग्राम . न्यु इंग्लिश स्कुल, खेरवाडी पोलीस स्टेशन जवळ. वांद्रे (पूर्व)
वेळ : सकाळी ९ ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत .

हरी ॐ  

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s