अश्विन नवरात्री पूजन व होम


  • अश्विन नवरात्री घटस्थापना :


१ चौरंग किंवा पाट,पाटावर पिवळे वस्त्र,त्यावर थोडेसे तांदूळ किंवा
गहू,त्यावर तांब्याचा कलश,कलशात तांदूळ किंवा गहू भरणे त्यावर तांब्याचे
ताम्हण व ताम्हणात अक्षता ठेवणे त्यावर आपल्या प.पु.नंदाईचा फोटो ठेवणे.रोज
दिपारती करणे.


” ॐ आल्हादिन्ये नंदाए संधीने नमो नमः ||”
हा जप १०८ वेळा करून रोज चिदानंदा उपासना करणे.
 

हे गहू / तांदूळ नंतर अन्नपूर्णा प्रसादम ला द्यावेत .नवरात्रीत आपण श्री राम रसायन तसेच मातृवात्सल्य विदानम ग्रंथाचे पठण करू शकतो.
————————–————————–————————
                             ——–ललिता पंचमी———
सुर्योदया पूर्वी सदगुरुंचा फोटो घरामध्ये सर्वत्र फिरवून फोटोंच्या ठिकाणीच ठेवावा.
पुरणाचा ( मुगाच्या डाळीचे पुरण ) नैवेद्य अर्पण करावा.
प.पु.बापूंचा फोटो फिरवताना खालील जप करावा.
“ॐ श्रेष्ठा स्मृतीच शुद्ध सर्व विद्या नमो नमः
शुभकार्या अधिष्ठात्री सीता फलदायिनी
नित्यस्वरूपा नित्यशुद्धा इच्छा कृतीवर्धिनी “

  • त्यानंतरची प्रार्थना-  ” हे माते तू सर्व जगताची तारिणी आहेस.तू इच्छापूर्तीवर्धिनी आहेस.तू
    थोडेतरी स्मृती मला दे.ती मिळालेली स्मृती मी माझ्या जीवनात वापरेन.”

ह्यावेळी प.पू.बापूंचा जप (२४/५४/१०८ वेळा) करावा. ——————————————————————–   
                           —— अष्टमीचा होम ——-
साहित्य : तांदूळ , ताम्हण , कापूर
कृती :
सूर्यास्तानंतर तांदुळाने स्वस्तिक काढून त्यावर ताम्हण ठेवणे ,
ताम्हणात २ मुठभर तांदूळ पसरावेत .
त्यावर मग मधोमध एक व ८ बाजूला ८ असे नऊ कापूर वड्या ठेवून , पहिल्या मधल्या कापराने अग्नी प्रज्वलित करावा.
प्रार्थना :
” सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके
शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते .”
जप : 

१ .ॐ श्री आदिमाता नमोस्तुते
2. ॐ श्री अनिरुद्धाय नमो नमः
3. ॐ श्री आल्हादिन्ये नंदाये संधीन्ये नमो नमः
4. ॐ श्री विश्वम्भरा तुळजा गुणसारिता नमो नमः .
जपसंख्या : २७ , ५४ , १०८ .

प्रत्येक वेळी एक कापूर ताम्हणाच्या मधोमध अग्नीत टाकणे . जप
संपेपर्यंत अग्नी प्रज्वलित ठेवावा.जप झाल्या नंतर साष्टांग नमस्कार
घालावा .मग ताम्हण उचलून बाजूला करून स्वस्तिक काढलेले तांदूळ गोळा करून त्या ताम्हणात ठेवणे .
हे तांदूळ दसर्यापर्यंत देव्हार्यात सफेद कपड्यात बांधून ठेवणे व दसर्याच्या दिवशी विसर्जन करणे .

One comment

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s