Ram Navami Utsav 2013


सद्‌गुरु श्री अनिरुद्ध
उपासना ट्रस्टतर्फे रामनवमीचा उत्सव शुक्रवार दिनांक १९ एप्रिल २०१३ रोजी
श्री हरिगुरुग्राम, वांद्रे (पुर्व) येथे सकाळी ९ वाजल्यापासून रात्री ९
वाजेपर्यंत साजरा केला जाणार आहे.

 • प्रतिवर्षाप्रमाणे श्री साईराम
  सहस्त्रयज्ञ संपन्न होईल. या यज्ञामध्ये श्रध्दावानांना ’क्षेमकल्याण’ व
  ’आपत्तीनिवारक’ अशा दोन प्रकारच्या समिधा अर्पण करता येतील. श्री साईराम
  सहस्त्रयज्ञामध्ये हवन केल्याने गतजन्मीच्या पापांचे भर्जन होते.
 • दुपारी १२.०० वाजता ’श्री रामजन्म’ पारंपारिक पध्दतीने साजरा करण्यात येईल.

 • श्री साईनाथांच्या तीन वस्तू म्हणजेच जपमाळ, त्रिशुल व शाळीग्राम यांचे
  पूजन व त्यासमोर ’घोरकष्टोधरण’ स्तोत्राचे अखंड पठण सुरु होईल.

 • तसेच, श्री साईनाथांच्या ’श्री सदाशिव मुर्तीस’ सतत राजोपचारे श्री साईनाथ
  महिन्माभिषेक’ अभिषेक चालू राहिल. श्री साईनाथ महिन्माभिषेक सकल कुटूंब
  स्वास्थ व अपत्यांचे आरोग्य ह्यासाठी फलप्रद आहे.
 • गतवर्षीप्रमाणे
  ह्यावर्षीही परमपूज्य सद्‌गुरु श्री अनिरुध्द बापूंच्या हस्तस्पार्शाने
  पावन झालेला ’श्री अनिरुध्द हंडीप्रसादाचा लाभ’ प्रत्येक भक्त घेऊ शकेल.

 • तसेच ’श्री साईनाथांचा तळीभरण’ विधी संपन्न होईल. याचे वैशिष्ट असे की
  तळीभरण विधीतील सहभाग व प्रसाद सर्व नऊ प्रकारच्या प्रसादांमध्ये श्रेष्ठ
  मानला जातो.
 • याच बरोबर, ’ॐ रामाय रामभद्राय रामचंद्राय नम:’ हा अखंड जप चालू असेल.
 • तसेच ’श्री साईसत्‌चरित्र ग्रंथातील अध्यायाचे पठण’ संपूर्ण दिवस करण्यात येईल.
 • रात्री महाआरती व ’साईराम सहस्त्रयज्ञ पूर्णाहुती’ होऊन या सोहळ्याची सांगता होईल.


वरील सर्व विधींमध्ये प्रत्येक भक्त वैयक्तिकरित्या सहभागी होऊ शकेल याची सर्वांनी नोंद घ्यावी

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s