॥ हरि ॐ॥ देव आमच्यासाठी वाकतो हे लक्षात ठेवा. प्रत्येक धर्मात गुडघ्यावर देवासमोर वाकायला सांगतात. हे वाकायचं का? कारण तो आमच्यासाठी वाकतो म्हणून. ती आदिमाता, ते चण्डिकापुत्र आमच्यासाठी वाकतच असतात. म्हणून आम्हाला त्यांच्यासमोर झुकायलाच पाहिजे. काय गरज पडलीय त्यांना आमच्यासमोर वाकायची? फक्त प्रेमापोटी ते वाकतात. फक्त प्रेम म्हणून आम्हाला त्यांच्यासमोर प्रेमाने वाकता यायला पाहिजे. तो देव आहे, boss आहे, शासक आहे म्हणून नाही तर तो आमच्यासाठी आयुष्यभर सतत वाकत असतोच म्हणून. गुडघ्याने त्याच्यासमोर वाकता येत नसेल तर मनाने त्याच्यासमोर वाका. मनाने वाका म्हणजे त्याच्यासाठी थोडा तरी बदल मनात घडवून आणा. कुठलीतरी आपली एक वाईट सवय कमी करणं, चुकीची गोष्ट थांबवणं म्हणजेच मनाने वाकणं. त्यांच्यासमोर वाकताना, ‘देवा, तू किती गोड आहेस, आई तू किती छान दिसतेस तुझ्यासारखं ह्या जगात कोणीही सुंदर नाही. तुझ्यापेक्षा बेस्ट काहीच नाही म्हणजेच बाकी सगळं तिच्यापेक्षा कमी दर्जाचं आहे’ असं वाटणं म्हणजे मनाने वाकणं. हे प्रेमाने झालं पाहिजे तिच्या हातातल्या शस्त्राकडे बघून नाही, तर तिच्या चेहर्‍याकडे बघून वाटायला हवं. आमचा त्रिविक्रमावर विश्वास असेल तर आमच्या आयुष्यात कुठलीही गोष्ट झिरो असणार नाही. कारण तो एकच खूप समर्थ आहे म्हणून त्या एकाच्याच बळावर अठरा भुवनांची तीर्थयात्रा व्यवस्थितपणे उत्तम, मध्यम आणि विगतही पार पाडतात. आदिमातेचं वचन आहे की, ‘जो कोणी हे उपनिषद्‌ वाचतो तो कितीही पापी, विगत असला तरीही त्याला तीर्थयात्रेचे सगळे फायदे मिळणारच.’ त्याच्यासमोर वाकणं म्हणजे त्याला प्रेमाने साद घालणं. ॥ “सदगुरु” अनिरुद्ध ॥


from Facebook
via IFTTT

त्रिविक्रमाचे एकत्व (Trivikram’s Oneness) Aniruddha Bapu Marathi Discourse 06-Mar-2014 एकाच वेळेस श्रध्दावानांसाठी तीन पावले टाकणारा श्री त्रिविक्रम त्रिविध देहावर कार्य करतो. प्रत्येकासाठी कार्य करणारा श्री त्रिविक्रम एकच कसा आहे.. हे परम पूज्य सद्‌गुरु श्री अनिरुद्ध बापुंनी(Aniruddha Bapu) गुरूवार दिनांक ६ मार्च २०१४ रोजी च्या मराठी प्रवचनात श्री हरिगुरुग्राम येथे स्पष्ट केले. http://ift.tt/POSUy0


from Facebook
via IFTTT