Thursday Discourse dated 28 April 2011


सद्‌गुरु श्री अनिरुद्ध बापुंचे प्रवचन (२८-०४-२०११) 
हरी ॐ  
जयन्ति मंगला काली.ह्या ११ नावांचा जयजयकार करत आपण पुढे गेलो. आज आपण आदि शंकराचर्यांनी लिहिलेले श्री देवी अपराध क्षमापन स्तोत्र बघणार आहोत . शंकराचार्यांचे ज्ञान इतके महान होते की त्यांना त्रैलोक्य संचारण सिद्धि होती.त्यांनी आदिमातेला ब्रम्हत्रिपुरसुंदरी ह्या नावाने आळवले.त्यांच्या श्री देवी अपराध क्षमापन स्तोत्रातुन आदिमातेची खरीखुरी प्रतिमा उभी राहते. अगदी clean and clear, cut and Precise. 
” न मत्रं  न यत्रं तदपि च न जाने स्तुतिमहो, 
न च आव्हानं ध्यानं तदपि न च जाने स्तुति कथा “
ह्या स्तोत्रातुन आचार्य सांगतात , मी मंत्र, यंत्र जाणत नाही , तुझी गद्यात स्तुति कशी करायची हेही ज्ञान मला नाही , तुझे आवाहन कसे करायचे हे मला दुरान्वयेदेखील माहीत नाही. ध्यानाबद्दल तर मी अज्ञानीच आहे. 
न जाने मुद्रा: ते तदपि च न जाने विलपनं ,
परं जाने मात: त्वद-अनुसरणं क्लेश हरणम ॥
 अगं आई, तुझ्या मुद्रांचे अर्थही मला कळत नाहीत, तु रागवलीस की आनंदी आहेस हे ही मला कळत नाही, एव्हढा मी अडाणी आहे. तुझ्या अठरा हातातील अठरा शस्त्रे तु कधी वापरतेस तेच मला कळत नाही.आई तुझ्याविना मला रडताही येत नाही गं, लहान बाळ जसे आई आई करुन रडते ते विरहाचे रडणेही मला जमत नाही गं … एव्हढा मी बावळट आहे. 
           परंतु एक मात्र मी नक्कीच जाणतो की तुझ्या मागोमाग (त्वद-अनुसरणं) येण्याने सर्व प्रकारचे क्लेशांचा नाश होतो. आदिदैविक, आधिभौतिक, आध्यात्मिक , दानव, राक्षस  असे कुठल्याही प्रकारचे क्लेश असुच शकत नाहीत. बाळाला आईने दुर केले तरी ते तिचाच पदर धरुन राहते, जेव्हा ते आईचा हात सोडुन जाते तेव्हा मग कुठेतरी धडपडते, त्यामुळे क्लेश उत्पन्न होतो आईचा विरह जाणवतो आणि मग ते बाळ परत आई आई करत आईच्या मागे मागे जाते. 
तदेतत क्षन्तव्य  जननि सकलोध्दाराणि शिवे ,
कुपुत्रो जायेत क्विचिदपि कुमाता न भवति ॥
“सकलोध्दाराणि” मराठीत “सगळे” ह्या अर्थाने सकल शब्द आपण वापरतो पण मुळ सकल शब्द खुप महान आहे. सगळ्यांचाच( जो जो उध्दार करुन घेऊ इच्छितो त्याचा) उध्दार करणारी.. किती अर्थ आहे ह्या षोड्शी मंत्रामध्ये !! मनुष्याच्या त्रिविध देहाचा आधीच्या जन्मातील असलेल्या त्रिविध देहाच्या संबंधामुळे (बीजामुळे- पूर्व जन्मातील कनेक्शन ) क्लेश उत्पन्न होतात. सकल हे त्रिमितीवरचे आहे, हे कुठलेही क्लेश कारक संबंध ऊरु नयेत म्हणुन ही सकलोध्दाराणि आधीच्या जन्माशी जोडणारे बीज मुळापासुन उखडुन टाकते. 

अश्या ह्या मंत्रमय स्तोत्राची CD  माझ्या(प.पू.बापू) आवाजात सर्वांना ऐकायला मिळणार आहे. परंतु ह्या स्तोत्राचा रोज अमुक वेळा म्हणेन असा कुठलाही नेम करु नका, आणि मला(प.पू.बापू) अडचणीत आणु नका.ह्या स्तोत्राचा मराठीत अर्थ तुम्ही वाचु शकता.ह्याची एक विशिष्ट रचना आहे,त्यामुळे ह्याचा उच्चार विशिष्ट प्रकारेच करावा लागतो. जे चुकीचे आहे ते चुकीचेच आहे आणि मी(प.पू.बापू) तुम्हांला कधीच चुकिचा सल्ला देऊ शकत नाही. सद्गुरुतत्व व आदिमाता हे पैशाने विकत घेता येणारे नसतात.त्यामुळे कुठल्याही संस्क्रुत पंडिताला पैसे देउन हे स्तोत्र म्हणवुन घेवु नका. 
ही सकलोध्दाराणि म्हणजे सकल – प्रत्येक गोष्टीचा उद्धार करते.मनुष्याच्या समग्रत्वाचा उद्धार करते म्हणजेच तुमच्याकडे जी गोष्ट ज्या स्थितीत आहे त्या स्थितीपासुन, त्या stage पासुन bestest stage पर्यंत तुम्हांला घेऊन जाते. 
विधे: अज्ञानेन द्रविणविरहेण-आलसतया
विधेय- अशक्यत्वात  तव चरणयो: या च्युति: अभूत ॥
आचार्य सांगतात, मला पुजेचा विधीही येत नाही, माझ्याकडे द्रव्याचा अभाव आहे ,पण खरं गोष्ट आई ही आहे की, मी ह्या सबबी देतो कारण मी स्वभावाने आळशी आहे. 
तुझ्या मागे “आई,आई” म्हणत येण्याचा पण मी आळस करतो.त्यामुळे आई माझ्याकडुन पुजासुद्धा नीट होत नाही.ह्या सगळ्या कारणांमुळे मी तुझ्या चरणांपासुन दुर झालो आहे आणि त्याला कारण एकच माझा आळस.

आईचा मार्ग फक्त परशुराम दाखवतो.पहिली मानवी माता रेणुका आई हे त्याच आदिमातेचे रुप. म्हणजेच सगळ्या जगाला आदिमातेच्या उपासनेचा मार्ग दाखवतो तो परशुरामच. मात्रुवात्सल्यविंदानम मध्ये आपण बघतो परशुरामास माता रेणुकेच्या स्म्रुती आठवताना त्या आदिमातेची आठवण येते मग त्याच ओढीने परशुराम गुरुदत्तात्रेयांकडे जातो व आदिमातेचे आख्यान ऐकतो. आईच्यामागे जाण्याचा आळस करु नका. पुढे आचार्य सांगतात, आणखीन काय करु ? मला क्षमा कर गं आई .कुपुत्र असणे सहज शक्य आहे पण आई तु कधिच कुमाता नव्हतीस व नसतेस.
हे आई, प्रुथ्वीवर तुझे साधेसुधे तुझे भक्त असे तुझे पुत्र खुप असतील, परंतु त्यामध्ये अतिशय अवखळ असा मी एक आहे.तुझे सगळे पुत्र चांगले आहेत, मी एकटाच वाईट आहे.ह्यातुन शंकराचार्य सांगतात आधी स्वत:कडे बघा.ती आई अतिशय क्षमाशील असल्यामुळे ती माझ्या पुढे पुढे चालतच असते.

मी (प.पू.बापू) तुमच्या पाठीशी कायम उभा राहीन, हा माझा शब्द जसा चांगल्या क्षणांसाठी आहे तसाच वाईट वेळेसाठी देखील आहे. मला(प.पू.बापू) फक्त आईच म्हणता येते.
तुम्ही आयुष्यात कितिही चुका करा पण ह्या आदिमातेचे चरण कधिही सोडु नका. माता रेणुकेचा विरह होताना त्या परशुरामाचा शोक लक्षात घ्या . स्वत:च्या शोकात बुडणारे अनेक असतात मात्र त्यातुन सगळ्या विश्वाचा उध्दार करणारा तो एकच परशुराम , ज्याने आपल्याला मातृवात्सल्यविंदानम दिले. 
“मदीय: अयं त्याग: समुचितं इदं नो तव शिवे ,
कुपुत्रो जायेत क्विचिदपि कुमाता न भवति ॥”

   हा जो माझ्याकडुन तुझा त्याग केला गेला आहे हे उचित नाही गं आई…मग कर ना काहितरी. मला जवळ तुच घे. मी वाईट आहे हे जाणुन तु मला जवळ घे . आईवार प्रेम कसे करायचे हे शंकराचार्य इथे शिकवतात. हाक घालायची ना तर ती ह्या आईलाच. ज्या क्षणी तुम्ही तिला प्रेमाने हाक मारता त्या क्षणी ती तुमची मोठी आई झालेलीच असते. म्हणुन प्रेमाने तिला हाक मारा,तिचे कुठलेही नाव घ्या. 
जगन्मात: मात: तव चरण सेवा न रचिता,
न वा दत्तं देवि द्रविणं अपि भूय: तव मया ।
आई तुझ्या चरणांची सेवा मी कधिच केलेली नाही ,तुझ्यासाठी एक कवडीसुद्धा खर्च केलेली नाही.तरीदेखील माझ्यासारख्या अधमावार तु अनुपम स्नेह करतेस ह्याचे कारण एकच “कुपुत्रो जायेत क्विचिदपि कुमाता न भवति”शरीराने ,मनाने , बुद्धीने कधीही तुझी भक्ती, सेवा, दान केले नाही तरीही तु माझ्यावर निरुपम प्रेम करतेस कारण मी कितीही कुपुत्र असलो तरी तु कुमाता नाही आहेस. 

तव अपर्णे कर्णे विशति मनुवर्णे फलमिदं 
जन: को जानीते जननि जपनीयं जपविधौ ॥
हे अपर्णे आई, तुझ्या मंत्रातले एक अक्षर जरी कानावर पडले ना तरी अगदी दरिद्री मनुष्याकडे सुद्धा करोडो मुद्रा येऊन थडकतात.  मग जे कायम तुझा जप करत असतात त्यांना काय मिळत असेल आणि ते कोण जाणू शकेल !!हे कोणीही जाणुच शकत नाही. जिथे परशुराम नाही जाणू शकला तिथे तुम्ही काय जाणणार ? 
आठवा पहिला अध्याय माता रेणुकेच्या भेटीनंतर आई एका निमिषात परशुरामास गंधमादन पर्वताकडे नेते. अनेक योजनांचे अंतर एका क्षणात कमी होते. अशी ही प्रेमळ आई. म्हणुन अनसुयेला पाहिल्यावर दत्तात्रेय व परशुराम दोघेही जप करतात ,
” ॐ नमश्चण्डिकायै  ,वात्सल्यचंण्डिकायै  नम:”ह्या आईचे वात्सल्य परशुरामाने अनुभवले म्हणुन तोच सर्वांना सांगु शकतो .
” आपत्सु मग्न: स्मरणं त्वदियं , 
करोमि दुर्गे करुणार्णवेशि ,
 नैतत शठत्वं मम भावयेथा:
क्षुधा -त्रुषार्ता जननीं स्मरन्ति
शंकराचार्य सांगतात , मी शठ आहे (शठ म्हणजे कपटी  , लबाड ) हे मला मान्य आहे, पण आई तु हे मान्य करु नकोस, तु मला शठ मानु नकोस. भुक आणि तहान लागली की मगच बाळाला आईची आठवण येते, एव्हढेच मला समजते. म्हणुन मी सदैव तुझा बाळच आहे. 
आदि शंकराचार्य आम्हांला सांगतात की, आईकडे बाळासारखा लाडिवाळ हटट करा.तिचे आई म्हणून मातृत्व अनुभवा. तिच्यापुढे नेहमीच शरणागत बाळ रहा. कुठलेही तर्क- कुतर्क करू नका . आई म्हणून ती शक्ती रूपाने आहेच पण तिला शक्ती  न म्हणता आईच म्हणा .तिच्या पुत्रांच्या शत्रूंची आई कधीच नसते तिथे ती दुर्गा रूपानेच असते ,त्या शत्रूंचा नाश करण्यासाठी  असते. 
 अपराध परंपरा पर्ण न ही माता समुपेक्षेते सुतं ..”
हे जगदंबे, तुझी माझ्यावर कृपा आहेच. आणि माझी अपराध परंपरा चालू आहेच . 
लक्षात ठेवा तुम्ही जी हाक आपल्या सद्गुरूला मारता तेव्हा सदुगुरू त्या आईला हाक मारत असतो.. तुमचा  एकमेव तारणहार तो परमात्माच असतो जो तुमची हाक आदिमाते पर्यंत  पोचवतो .म्हणून त्या परमात्म्याची तिच्या पुत्राची कधीच उपेक्षा करू नका.
” मत्सम: पापी नास्ति..” 
माझ्यासारखा दुसरा पापी नाही व तुझ्यासारखी कोणी क्षमाशील नाही, हे जाणून आई तुला जे योग्य वाटेल तेच तू कर . “
त्या आदिमातेकडे व परमात्म्याकडे sorry म्हणायची गरज नसते व thanks देखील म्हणायची गरज नसते. फक्त कायम thankful असावे लागते. 
Advertisements

Thursday Discourse dated 21 April 2011


सद्‌गुरु श्री अनिरुद्ध बापुंचे प्रवचन (२१-०४-२०११) 
हरी ॐ
श्री वरदाचण्डिका प्रसन्नोत्सवाची तारीख जवळ येत आहे. सगळीकडे उत्सवाची तयारी जोरात सुरु झाली आहे. माझी (प.पू.बापु) आईसुद्धा उत्सवाला येण्यासाठी तयारीला लागली आहे. ह्या उत्सवामध्ये काय असेल ते आधी बघूया. श्री वरदाचंडिका प्रसन्नोत्सव उत्सवात महापुजनची पहिली batch सकाळी ७ वाजता सुरु होईल व ८.३० पासुन रक्तदंतिकेचे पुजन सुरु होईल. मातृवात्सल्यविन्दानम्‌  ग्रंथात आपण बघतो की आदिमातेने केलेल्या आज्ञेनुसार श्री गुरुदत्तात्रेयांकडुन श्रवण केलेल्या व स्वत: अनुभवलेल्या  चन्डिकेच्या आख्यानाचा उपदेश श्री परशुरामांनी आदिमातेच्याच आज्ञेनुसार आपल्या तीन शिष्यांना ऋषी सुमेधस, ऋषी हरितायन, व ऋषी मार्कण्डेय ह्यांना केला. ह्यामधुन ऋषी सुमेधसाने “दुर्गा सप्तशती” आख्यान लिहिले, ऋषी हरितायनाने “त्रिपुरारहस्य”, तर ऋषी मार्कण्डेयाने “मार्कण्डेय पुराण” लिहिले.

आपल्या उत्सवात होणार्या सहस्त्रचण्डि यज्ञाचे वर्णन दुर्गा सप्तशती मध्ये आढळते. दुर्गा सप्तशती हा ग्रंथ यज्ञा करिताच लिहिला गेला आहे. सहस्त्रचण्डि यज्ञ म्हणजे ह्या ग्रंथाचे १००८ वेळा पठण व त्याच पटीत हवन. हा खुप खर्चिक व दुर्मिळ (rarely) होणारा यज्ञ आहे. ह्या उत्सवात मी (प.पू.बापु) निवडलेल्या पुरोहितांद्वारे हा यज्ञ होणार आहे. तर नवचण्डी यज्ञ २२ व २३ एप्रिलला गुरूक्षेत्रमला होणार आहे, हा नवचण्डी यज्ञ सुद्धा शुभंकर ताकद वाढवणारच आहे. नवचण्डी म्हणजे नऊ पाठ असेच शतचण्डी, व सहस्त्रचण्डी.

आता सहस्त्रचण्डि यज्ञाविषयी थोडक्यात माहिती बघु. ह्यात अग्नीमंथन पध्दतीने (लाकूड एकमेकांवर घासुन) अग्नी निर्माण करुन नंतर योगिनी मंडलाचे पठण होणार आहे. नंतर  क्षेत्रपालाचे पुजन (प्रत्येक जागेचा जो रक्षक त्याला क्षेत्रपाल म्हणतात), भैरव मंडल पुजन, प्रधान मंडलाची स्थापना, ११ रुद्रांचे पुजन, दररोज वेगवेगळ्या द्रव्यांचे अर्चन अश्या प्रकारचे बरेच विधी होणार आहेत. ह्याची विस्तृत माहिती लवकरच उपलब्ध होईल.

ह्या यज्ञाचे साहित्य बघूया. साहित्यामध्ये ह्यात ५ किलो कुंकू, ५ किलो साधा कापूर, २ किलो भिमसेनी कापूर, १२५ किलो तुप, २५ किलो सुपार्या, ५ किलो हळकुंड, केशराच्या ५० डब्या, श्वेत चंदनाची पावडर ५ किलो, गायीचे तुप ३०० किलो, काळे तीळ २०० किलो, जव १५० किलो, आंब्याचे लाकुड १००० किलो, ५ मीटर लाल वस्त्र, १०८ सप्तशती ग्रंथ, १५० फळे, ह्यात महाकाली, महासरस्वती, महालक्ष्मी ह्यांच्या सोन्याच्या यंत्रमय प्रतिमा, चांदीची शंकराची पिंड, चांदीचा रथ, पंचधातुचे शंख, ११०० विड्याची पाने, २१ वेण्या, २१ हार, २४ किलो दुधी भोपळा, २४ किलो काकडया, १०० लिटर दुध, १०० कटोऱ्या, १००० द्रोण, १००० पत्रावळ्या, इत्यादी…. ही लिस्ट भरपुर मोठी आहे पुर्ण सांगायची झाली तर सगळे प्रवचन त्यावरच  होईल. 

ह्यावरुन तुम्हाला थोडक्यात अंदाज येईल की हा सहस्त्रचण्डि याग किती मोठा आहे. ह्यापेक्षा जास्त सामुग्री ही महापुजनासाठी लागणार आहे.

म्हणजेच तुमच्या लक्षात येईल की हा उत्सव किती भव्य आणि दिव्य होणार आहे. प्रेमाने जेवढया वेळा दर्शन घेता येईल तेवढे घ्या, पण मध्येच रांगेत घुसुन चोरुन दर्शन घेवू नका. उत्सवातील प्रत्येक गोष्टींचा व्यवस्थित फायदा घ्या. 

“उतून चालला आहे खजिना ..”
खजिन्याचे कुलुप उघडलेले आहे, तुम्ही किती लुटुन नेणार हे तुमची झोळी किती मोठी आहे त्यावर अवलंबुन आहे. त्यामुळे झोळी वाढवा आणि खजिना उदंड भरुन न्या.

“जयंती मंगला काली..” गजर संपला, नावे बघुन झाली. उत्सवात देवीची स्तोत्रे, मंत्र जी घेतली जाणार आहेत त्या प्रत्येकावर बोलायचे झाले तर प्रत्येकासाठी २-३ प्रवचने होतील. प्रत्यक्षाच्या अग्रलेखांमधुन आपण आता हास्य बघतो आहोत, पुढे तांडव बघणार आहोत. ह्यात १० काळ, १० अवस्था बघितल्या. ह्यामध्ये काल म्रुत्यु कुठेच नाही. भारतीय संस्कृतीत एक जन्म ते दुसरा जन्म हा प्रवाह कुठेच खंडित नाही. ज्याप्रमाणे एक वस्त्र काढुन दुसरे घालतो तसेच एक जन्म ते दुसरा जन्म हा प्रवाह आहे. त्यामुळे मृत्यू ही संकल्पना भारतीय संस्कृतीत मान्य नाही.

श्वास आत घेण्याच्या क्रियेला संस्कृत मध्ये पुरक म्हणतात तर श्वास बाहेर टाकण्याच्या क्रियेला रेचक म्हणतात. श्वास आत घेवुन बाहेर टाकण्याच्या मधल्या काळाला अंर्त कुंभक तर श्वास बाहेर टाकल्यावर परत आत घेईपर्यंतच्या मधल्या काळाला बाह्य कुंभक म्हणतात. ह्याचाच अर्थ मृत्यू म्हणजे लांबलेला बाह्य कुंभक, ह्या जन्मात श्वास सोडला पुढच्या जन्मात श्वास घेतला. म्हणून मृत्यू ही जराही घाबरण्याची अवस्था नाही. हा काळ कधी १० वर्षाचा असेल तर कधी १०० वर्षाचा…हा मधला काळ वाढला की आपण घाबरतो. लक्षात ठेवा मानवा़ची १०० वर्षे म्हणजे परमात्म्याचे एक निमिष (डोळे मिटुन उघडणे). बाह्य कुंभक जास्त वाढला कि आपण त्याला लौकिक मृत्यू मानतो. भारतीय संस्कृतीत मृत्यूनंतर जीव परमात्म्याकडे जातो. सच्चा श्रद्धावान मृत्यूनंतर आपल्या बापाला भेटण्यास आतुर असतो. मृत्यू म्हणजे  extened ( लांबलेला) बाह्य कुंभक म्हणुन भारतीय संस्कृतीत मृत्यूची भीती नाही. सद्‌गुरु तत्त्वावर विश्वास ठेवणारा मृत्यूला घाबरत नाही. कारण त्याचा extened  बाह्य कुंभक केवढा ठेवायचा ते सद्‌गुरु ठरवतो.

“ज्याचे हृदयी श्रीगुरु स्मरण, त्यासी कैचे भय दारुण ||
काळमृत्यू न बाधे जाण, अपमृत्यू  काय करी ॥”
आदिमाता चण्डिकेच्या आज्ञेने हा परमात्मा ह्या बाह्य कुंभक व अंर्त कुंभक ह्यांचे नियंत्रण करतो. जे श्रद्धावान नाहीत त्यांचा मृत्यू  कलिपुरुष ठरवतो. तर जो श्रद्धावान असतो त्याचा अंर्त कुंभक व बाह्य कुंभक परमात्मा ठरवतो, त्याची आई ठरवते. कलिपुरुष हा आदिमातेचे नियम पाळत नाही म्हणुनच हा मोहात मानवाला पाडून षड्ररिपूंना बलवान करुन यातना देणारा असतो. तर परमात्मा हा मानवासाठी जे उचित आहे उपयुक्त आहे ते ठेवुन, वाईट तेवढे बाजुला काढणारा असतो.

श्री वरदाचण्डिका प्रसन्नोत्सव करण्यामागे माझा (प.पू.बापू) महत्त्वाचा हेतु हा आहे की, माझे श्रद्धावान जे आहेत त्यांचे अंर्त कुंभक व बाह्य कुंभक हे कलिपुरुषाच्या हातात ह्याच्यापुढे कधीच जावू नयेत.

ह्या उत्सवात मातृवात्सल्यविन्दानाम्‌ ह्या ग्रंथाच्या संस्कृत संहितेचे सतत पठण असणार आहे. ह्या उत्सवात जो जो श्रद्धावान येईल त्याचे अंर्त कुंभक व बाह्य कुंभक हे कलिपुरुषाच्या तावडीतुन सुटुन परमात्म्याकडे येणारच.

ह्या उत्सवात गंगामाता अवतरणार आहे, इथे जे गंगामातेच्या पात्रात पाणी असेल ते डोळ्याला किंवा डोक्याला लावु शकता पण ते उत्सव चालु असताना पिऊ नका किंवा बाटलीत भरुन घेवु नका. कारण माझा (प.पू.बापू) संकल्प असा आहे की, उत्सवाच्या १० दिवसात विविध मंत्रोपचार झाल्यावर तुमच्या सगळ्यांसाठी ते सहन होईल अश्या अवस्थेत ते तुम्हांला उत्सवानंतर मिळावे.

इथे जी गंगामाता अवतरणार आहे ती त्रिपथगामिनी आहे, भागिरथी, अलकनंदा, मंदाकिनी अशी तिची तिन्ही रुपे इथे एकत्रित असणार आहेत. म्हणुन तिला स्पर्श करा पण प्राशन करु नका. उत्सवानंतर अगदी गरीबातलीगरीब व्यक्ती देखील ते गंगाजल घेऊ शकेल व आपल्या घरी ठेवु शकेल अश्या तर्हेने ते जल संस्थेतर्फे सर्वांसाठी उपलब्ध होणार आहे. हे गंगाजल पुष्कळ मोठया प्रमाणात आपल्या कार्यकर्त्यांनी आणले आहे त्यामुळॆ, “मला मिळेल की नाही?” असा विचारही मनात आणु नका. प्रत्येकाला हे गंगाजल मिळणार आहे ह्याची खात्री बाळगा. आणि एक गोष्ट सांगुन ठेवतो जेथुन हे जल आणले आहे त्या १०८ नद्या, ते सप्त समुद्र, ते मानस सरोवर इथे दररोज उत्सवाला दर्शनासाठी येणार आहेत त्यामुळे जर समजा जल कमी पडलेच तर मी (प.पू.बापू) त्यांच्याकडॆ शब्द टाकेन ते आनंदाने तयारच आहेत त्यांचे जल ह्या उत्सवासाठी द्यायला. अतिशय दुर्मिळ असा हा उत्सव आहे त्यामुळे सत्ययुगापासुन ह्या उत्सवासाठी तिष्ठत असणारी सर्व दैवते ह्या उत्सवाला येणारच आहेत.

ह्या उत्सवात सगळी स्तोत्रे माझ्या (प.पू.बापू) आवाजात तुम्हांला ऐकावी लागणार आहेत. त्यातल्या काही अत्यंत महत्वाच्या स्तोत्रांची CD सर्वांसाठी लवकरच उपलब्ध होणार आहे तसेच मातृवात्सल्यविदानाम्‌ ह्या ग्रंथाचा संस्कृत पाठ माझ्या (प.पू.बापू) आवाजात तर आई अनसुयेची आरती तुमच्या लाडक्या नंदाईच्या आवाजात व महिषासुरमर्दिनी स्तोत्र सुचितदादांच्या आवाजात असलेली CD देखील सर्वांसाठी उपलब्ध होणार आहे. 

ह्या CD काढण्यामागे माझे (प.पू.बापू) दोन हेतु आहेत ते म्हणजे ह्या उत्सवातील पुजनाचा महत्वाचा भाग हा कायम तुम्हा सगळ्यांसोबत रहावा व जे ह्या उत्सवाला येऊ शकणार नाहीत त्यांच्या घरातही हे मंत्र सर्वांना ऐकायला मिळावेत.

इथे प्रत्येक उचित गोष्ट मिळेल, त्याचा नीट सर्वांनी अंगिकार करा. कलिपुरुषाच्या ताब्यात असलेले तुमचे जीवन मला बघवत नाही. चांगले करायला जावे आणि वाईट गोष्टीत अडकावे, अंग धुवायला जावे आणि चिखलात लोळावे, अन्न ग्रहण करायला जावे आणि त्यात कावळ्याने विष्टा टाकावी असे तुमचे जीवन झाले आहे, हे मला (प.पू.बापू) बघवत नाही.

अनेक प्रयत्न करुनही चुका घडतच आहेत हे मला मान्य आहे, पण जर तुम्ही श्रद्धावान असाल तर तुम्हांला त्या चुकांच्या प्रभावापासुन दुर करणे मला सोपे पडते. जेवढे तुम्ही नीट वागाल तेवढे मग माझे कष्ट कमी होतात. तुम्ही कसेही वागलात तरी माझा स्वभावच असा आहे की, मी (प.पू.बापू) माझ्या मित्रांसाठी धावुन येणारच. त्यांमुळे माझे कष्ट वाढवायचे की कमी करायचे ते तुम्ही ठरवायचे. जो जो माझ्यावर मनापासुन प्रेम करतो त्याचे मला कष्ट पडत नाहीत, कारण प्रेम हाच माझा (प.पू.बापू) श्वास आहे. जर माझ्यावर प्रेम नसेल तर मला कष्ट पडतील. मग मला कष्ट पडू द्यायचे की मला आनंद द्यायचा हे तुमच्यावर आहे. 

ह्या CD तुम्हांला खुप काही भरभरुन देतील. कारण ह्या CD  मधुन प्रत्येक श्रद्धावानाला मिळणार आहे ते फक्त पावित्र्य, सौंदर्य व पराक्रम.पुढच्या गुरुवारी आपल्याला शंकराचार्यांचे देवी अपराध क्षमापन स्तोत्र  बघायचे आहे. हे स्तोत्र माझे (प.पू.बापू) अत्यंत लाडके स्तोत्र आहे. माझी (प.पू.बापू) आई किती प्रेमळ आहे हे ह्या स्तोत्रातुन बघुन आपल्याला ह्या उत्सवाला जायचे आहे. लेकरे कितीही टवाळ असली तरी ही मोठी आई कधीच कुमाता बनत नाही.
आपल्या शरीराला, मनाला व प्राणाला आंघोळ घालणारे हे स्तोत्र आहे. हे स्तोत्र आपल्याला समजुन घ्यायचे आहे पुढच्या गुरुवारी आपल्या आदिमातेच्या स्वागतासाठी..

हरी ॐ 

Thursday Discourse (07-04-2011)


हरि ॐ
सद्‌गुरु श्री अनिरुद्ध बापुंचे श्री हरि गुरु ग्राम येथील प्रवचन. (०७-०४-२०११)

जयंती मंगला काली ,भद्रकाली कपालिनी 

   दुर्गा क्षमा शिवा धात्री स्वाहा स्वधा नमोस्तुते ” 

स्वाहा बघितली आता ११ वे नाव स्वधा बघायचे आहे. पहिल्याच दिवशी मी (प.पू.बापू)सांगितले कि ही नावे विशिष्ट क्रमाने येतात. अहंकार विरहित असे परमेश्वराला अर्पण करायचे रुप म्हणजे स्वाहा, त्यापुढे येते ती स्वधा. पितरांना अर्पण करताना स्वधा चा उच्चार होतो. मृत्यू नंतर उच्चारले जाते म्हणून हे नाव अपवित्र होते का? बिलकुल नाही. मुळ शास्त्राला बाजुला ठेवुन परंपरेनुसार चालत आलेल्या रुढींमुळे मृत्यू नंतरच्या विधिंना अपवित्र समजले जाते. 
मी(प.पू.बापू) ग्रंथराज मध्ये सांगितले आहे श्राध्द म्हणजे आई वडिलांची जिवंतपणी केलेली सेवा. त्यांच्या म्रुतुनंतर त्यांच्यासाठी केलेली प्रार्थना हे मृत्यू नंतरचे श्राध्द. 

श्राध्दाच्या वेळी पिंड ठेवले जातात .हे पिंड म्हणजे नक्की काय? हे आपल्याला माहिती पाहिजे. पुर्वीच्या वेळी मनुष्य संन्यास घ्यायचा त्यावेळच्या विधिच्या वेळी पिंड केले जातात.पिंड म्हणजे देहाचे प्रतिक. हे पिंड म्हणजे तीन भाताचे गोळे असतात.अन्नमय देहाचे प्रतिक म्हणुन हे ठेवले जातात. आधीच्या दोन जन्माच्या पाप – पुण्याचे प्रतिनिधित्व करणारे दोन पिंड तर जे unknown आहे त्याचे प्रतिनिधित्व करणारे एक पिंड असते. 

संन्यास घेताना मनुष्य शपथ घेतो की, मी संन्याशाप्रमाणॆ जगेन. संन्यासाची भिक्षा घेताना आधीच्या जन्मांमधुन स्वत:ची मुक्तता करण्यासाठी हे विधी सांगितले आहेत. 
म्रुत्युनंतर विशिष्ट दिवस सुतक पाळावे असा कुठेही उल्लेख नाही.व्यापारी वर्गात ४ दिवसच सुतक पाळले जाते, त्यांना व्यवसाय जास्त दिवस बंद ठेवता येत नाही , तर ज्या लोकांकडे आराम आहे अश्यांमध्ये ४० दिवस पण सुतक पाळले जाते.पुर्वीच्या काळी सर्व नातेवाईक दुर राहयचे. लगेच कोणाच्या म्रुत्युनंतर येणे त्यांना जमायचे नाही त्यामुळे मग १० वे, १३ वे अश्या विधिंची सोय करण्यात आली. कुठल्याही शास्त्रात अमुक दिवशीच असे करावे असा उल्लेख नाही. 
अनेकांचा समज असतो कि, म्रुत्युनंतर आत्मा घराभोवती फिरतो .म्हणुन सगळे जोर-जोरात रडतात. का? तर फिरणार्या आत्म्याला वाटले पाहिजे की त्याच्या म्रुत्युमुळे सर्वांना खुप दु:ख झाले आहे.मग तो तिथे न थांबता निघुन जातो. त्याचप्रमाणे १० व्या दिवशी तो आत्मा वास येईल इतक्या अंतरावर घराच्या वरुन फिरत असतो असं समज असतो. मग तो कावळ्याच्या शरीरात शिरतो आणि त्याला आवडणारी गोष्ट खावुन जातो. अश्या प्रकारचे गैर समज अजुनही आहेत. 
आपण विधि का करतो त्या मागचे शास्त्र कोणी ही नीट जाणून घेत नाहीत. ह्याचेच एक उ.दा. म्हणजे एक मुलगा आपल्या आजोबांचे श्राध्द करत होता. त्या वेळी त्याचे वडिल जिवंत होते.तरिही दोन पिढ्यांच्या पिंडाचे पुजन करायचे अश्या समजुतीमुळे त्या मुलाच्या वडिलांचे ते जिवंत असतानाही त्यांच्या नावाचा पिंड ठेवुन पुजन केले गेले. ही घडलेली घटना आहे. 
           शास्त्रामागील अर्थ समजुन न घेतल्याने आपण असे आचरटासारखे वागत असतो.मग मनुष्य जिवंत असतानाही त्याचे पिंड ठेवुन पुजन केले जाते. ज्योतिष शास्त्र वाईट नाही पण त्याच्या आहारी जावु नका. अजुनही कोणी घरात वारले की कुठले नक्षत्र लागले ह्यासाठी पंचांग बघितले जाते. पंचंक लागले की मग घरातील पाच जण मरणार म्हणुन ते टाळण्यासाठी विधी सांगितले जातात. आपण ते अज्ञानामुळॆ घाबरुन करत असतो. 

मी(प.पू.बापू)  श्राध्दाबद्दल ग्रंथातही सांगितले आहे, की जिवंतपणी आई-वडीलांची काळजी घेतली नाही, त्यांना कसेही वागवले आणि त्यांच्या म्रुत्युनंतर महाजेवण वाटले तर त्याला काही अर्थ नसतो. तुमच्या गावात ज्या काही प्रथा असतील त्याप्रमाणे जरुर श्राध्द करा पण हे श्राध्द का करायचे असते ते नीट समजुन घ्या. 

घरातील व्यक्तीच्या म्रुत्युनंतर घरात निर्माण होणार्या negative स्पंदनातुन बाहेर येण्यासाठी आपण श्राध्द करत असतो .  म्रुत्युनंतर आत्मा कुठेही फिरत नसतो. प्रत्येक मनुष्याचा लिंगदेह म्रुत्युनंतर त्रिमितितुन चतुर्मितीत जातो. आपण श्राध्द विधी घरात श्रध्देने करायचे असतात ते घरात पवित्र वातावरण निर्माण करण्यासाठी. अश्या दु:खाच्या प्रसंगी आप्तांना बोलवल्यामुळे मन आपोआप दुसर्या गोष्टीत रमते. 
हल्ली नातलगच नको असतात किंवा कमी असतात .त्यामुळे माणसाच्या म्रुत्युनंतर एक स्मशानातला माणूस ambulance मधली २-३ माणसे,अशी मोजकीच लोक असतात. पुर्वीच्या काळात अगदी आजुबाजुच्या घरात जरी कोणी वारले तरी २-४ नातेवाईक कायम घरी राहायचे.हल्ली प्रत्येकजण privacy maintain  करायला बघतो, अचानक कोणी पाहुणे घरी आले तर त्यांना manner less समजले जाते. पुर्वीच्या काळी घरात अचानक कोणी नातलग आले तर त्यांचे आनंदाने स्वागत केले जायचे. हल्ली लोकांना कोणी घरी आलेले नको असते. ही सगळी सध्याची परिस्थिती शास्त्राच्या विरोधात आहे. 
शास्त्र आपल्याला काय शिकवते? तर सांघिकी व्रुत्ती. “धा” हा शब्द म्हणजे धारण करणे. संन्यस्त वृत्तीची दीक्षा  घेताना प्रार्थना केली जाते की, आजपासुन मी स्वत:ला फक्त परमेश्वराशी जोडले आहे. मी संन्यस्त वृत्तीला स्वत: भोवती धारण करत आहे . 

स्वधा म्हणजे स्वत:च स्वत:चा आधार असणारी, स्वत:च स्वत:ला धारण करणारी. संन्यस्त व्रुत्ती म्हणजेच स्वधा व्रुत्ती. ज्यामध्ये फक्त परमेश्वर हवा आहे हे एकच मागणे असते बाकी कश्याचीही आवश्यकता नसते.  हे जे ११ वे नाव आहे ती स्वत:च स्वत:ला धारण करणारी आहे. 

हे एक circle  आहे ज्यात स्वधा शुन्य अंशावर आहे तर जयंती ३६० अंशावर आहे. म्हणजेच जोपर्यंत मनुष्य स्वकर्तुत्वाने पाऊल टाकत नाही तोपर्यंत तो विजयी होऊ शकत नाही. self dependent  बनायचे असेल तर आधी स्वाहाकार अंगीकारणे आवश्यक आहे. स्वाहाकार म्हणजेच स्वत:ला भगवंताच्या चरणी अर्पण करणे, रोजच्या कामाव्यतिरीक्त असलेला प्रत्येक क्षण भगवंताच्या नामस्मरणात घालवणे. असे जेव्हा घडेल तेव्हा स्वत:च स्वत:ला धारण करण्याची शक्ती प्राप्त होते. आधी स्वधाकार आणि मग स्वाहाकार(आधी स्वकर्तुत्व आणि मग अर्पण करणे) असा उलटा क्रम होऊ शकत नाही.  म्रुत्युनंतर परत जन्म घ्यायचाच असतो पण तो हाच जन्म नसतो (म्हणजे म्रुत्युनंतर परत त्याच जन्मात २० वर्षा़चे होऊन येता येत नाही) त्याच प्रमाणे स्वधाकार हा स्वाहाकारच्या आधी प्राप्त होऊ शकत नाही. त्यासाठी प्रथम त्याच्या चरणी स्वत:ला अर्पण करता आले पाहिजे. 

ह्यासाठी आपल्याकडे तेव्हढी ताकद असते का ? समजा १ हजार किलो सोन्यावर तुमच्या नावाचा stamp  आहे, पण ते सोने आहे थरच्या वाळवंटात जिथुन तुम्हांला ते सोने आणण्यासाठी कुठेलेही साधन उपलब्ध नाही. मग तुमची capacity  आहे का ते सोने आणण्याची? म्हणजेच एव्हढे सोने आहे पण ते नेता येत नाही.असेच देवाच्या भांडाराचे असते. देवाने त्याच्या भांडाराला कधिच कुलुप लावलेले नसते. पाप्यांसाठी व पुण्यांसाठी हे भांडार समानपणे कायम खुले असते. फक्त हा परमात्मा श्रद्धावानांसाठी नेहमी partiality  करत असतो.तो तुमच्या मालकीचा असलेला खजिना उचलुन नेण्यासाठी वेगवेगळ्या वाटा सुचवतो. 
तो तुमच्यासाठी (श्रद्धावानांसाठी) extra चे काम करतो. ज्याप्रमाणे पिक्चरमध्ये जास्त मेहनत हिरो पेक्शा त्याच्यासाठी काम करण्यार्या extra ची असते, तसे extra चे काम तो परमात्मा करत असतो . आपण मात्र ते स्वत: केले असे समजुन स्वत:ला extra ordinaory  समजत असतो. 
परमात्मा गुपचुप तुमच्या ओझ्याला काठी लावत असतो.असे असतानाही आयुष्यात जेव्हा वाईट घटना घडतात ,अपघात होतात तेव्हा समजायचे जर नामस्मरण नसते केले तर अधिक वाईट घडले असते.  परमात्मा श्रद्धावानांना नेहमी दुप्पटीने देत असतो. जर तुम्ही १ ग्रम बळ दिले तर तो २ ग्रम बळ देतो. “तुम्हरे प्रेम राम के दुना”
म्हणुन आधी स्वाहाकार अंगिकारायला हवा. त्यामुळे पुण्य करण्याची ताकद वाढते व वाईट गोष्टींची ताकद कमी होते. रोजच्या जीवनातील उ.दा. म्हणजे चांगला ग्रुहस्थाश्रम करण्याची ताकद वाढते व व्यभिचार करण्याची ताकद कमी होते. पण आपल्याला हे नको असते. मनुष्य आधीच limited पुण्य घेवुन जन्माला आलेला असतो अश्यावेळी जर आधी स्वाहाकार नसेल तर ते पुण्य लगेच संपुन जाणार. 
स्वाहाकार हा अनेक मंत्रांमधुन उच्चारला जातो तसा स्वधाकार उच्चारला जात नाही. मग हा स्वधाकार करतात कसा ? ह्यासाठी सर्वांत श्रेष्ठ मंत्र पंचमुखहनुमान कवचामध्ये आहे तो म्हणजे ,

“ॐ हरिमर्कट मर्कट मंत्रमिदं ,परिलिख्यती लिख्यती वामतले , 
    यदि नश्यति नश्यति शत्रुकुलं ,यदि मुन्चति मुन्चति वामलता “
वाम म्हणजे डावा. हनुमंताच्या चित्राच्या खाली डाव्या बाजुला रोज हा मंत्र ११ वेळा लिहायचा. 
ह्या मंत्रात सांगितलेली वामलता ही ३ गोष्टींनी बनलेली असते –
१) प्रत्येक मनुष्याचे दोन जन्माचे पाप
२) कलिचा प्रभाव 
३) शनिचा प्रभाव 
ह्या तिघांनाही वामलताच म्हणतात. ह्या वामलतेचे (लता म्हणजे वेल) बंधन मनुष्याच्या जन्मासोबत वाढत जाते व त्याला हालचाल करण्यापासुन रोखते.त्याला चांगल्या गोष्टींपासुन दुर नेते. 
म्हणुन ह्या वरील तीन गोष्टींपासुन बाहेर पडण्यासाठी हे बंधन तोडले पाहिजे, ह्यासाठी आवश्यकता असते ताकदीची. ही वामलता कापल्यावरच सर्व सुख उत्पन्न होते. आणि ही वामलता कापता येते ती “ॐ हरिमर्कट मर्कट..” ह्या मंत्रामुळे.
तुम्ही ज्यांना सद्गुरु मानता त्यांनी दिलेला कुठलाही मंत्र हा नेहमी स्वाहा, वषट,फट,हुं, ह्यांनीच बनलेला असतो मग तरीही  “ॐ हरिमर्कट मर्कट..” ह्या मंत्राची आवश्यकता का असते ?
नेहमी लक्षात ठेवा जेव्हा तुम्ही संकंटांनी ग्रासलेले असता तेव्हा ३ गोष्टींचा आश्रय घ्यायचा. 

१) पवित्र क्षेत्राचा म्हणजे गुरुक्षेत्रमचा आश्रय.
२) गुरु शब्दाचा आश्रय 
३) गुरु मंत्राचा आश्रय 
ह्या तीन गोष्टी असताना घाबरायचे काही कारणच नाही. मग “ॐ हरिमर्कट मर्कट..” ह्या मंत्राचा उपयोग काय? असा प्रश्न पडेल.

ह्या वरदा चंण्डिका प्रसन्नोत्सवापासुन “ॐ हरिमर्कट मर्कट..” ह्या मंत्राची वही उपलब्ध होणार आहे. ह्यात प्रत्येक पानावर उजव्या बाजुला हनुमंताचे एक विशिष्ट चित्र असणार आहे व डाव्या बाजुला ११ वेळा “ॐ हरिमर्कट मर्कट..” हा जप लिहायचा मग डोळे बंद करुन ११ वेळा म्हणायचा.  
प्रसन्नोत्सवापासुन रामनामाच्या वहीसोबत अजुन काही वह्या मिळणार आहेत त्यात ही हनुमंताचे विशिष्ट चित्र वही देखील सगळ्यांना उपलब्ध होणार आहे. 
“ॐ हरिमर्कट मर्कट..” ही वामलतेचा नाश करणार्या मंत्राची वही मी(प.पू.बापू) स्वत: तयार केली आहे. ही वहीच तुम्हांला तुमच्या आयुष्यात स्वधाकार आणण्यासाठी उपयोगी ठरेल.
“प्रत्येकाने मी कितीही चुकलो, कितीही पापी असलो तरी आमचा बापु कायम आमच्यासोबत आहे ही खात्री कायम बाळगा .” परमात्म्याच्या दोन शक्ती असतात.

१) अंजना शक्ती – स्वधा शक्ती (परमात्मा प्रगट रुपात असतो) म्हणजेच प्रयास. 
२) व्यंजना शक्ती – स्वाहा शक्ती (परमात्मा भाव रुपात असतो).
ह्यातील स्वाहा शक्ती म्हणजे अनसुया माता तर स्वधा शक्ती म्हणजे अंजनी माता.(हनुमंताची माता)
आतापर्यंत एकच वही होती आता १ + १० म्हणजे ११ वह्या सगळ्यांना प्राप्त होणार आहेत. ही अंजना वही पण रामनाम बँकेतच. हनुमंत हा ११ व्या दिशेचा स्वामी आहे. मनुष्याला जन्मापासुन बांधुन ठेवणारी वामलता तोडण्यासाठी ही अंजना वही आहे. 
“ॐ हरिमर्कट मर्कट..” हा मंत्र असलेली वही श्री वरदा चंण्डिका प्रसन्नोत्सवामध्ये तुम्हा सर्वांसाठी सिद्ध होणार आहे. ह्या वहीची परीक्षा घ्यायला जावु नका, काही उपयोग होणार नाही. 

जयंती पासुन प्रवास सुरु झाला होता आणि आता स्वधापर्यंत येवुन परत जोराने प्रवास सुरु झाला आहे. इथे प्रत्येक नामानुसार ताकद वाढत जाते. कुठलेही प्रयास करताना भक्तीने सुरुवात केली तर आपोआप थकवा कमी होईल व स्वत:च स्वत:ला धारण करणारी स्वधा शक्ती तुमच्याकडे येईल. 
हरी ॐ 
———————————————————————– 
* प्रवचनानंतर बापूंनी दोन महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या 
१) श्री वरदा चंण्डिका प्रसन्नोत्सवातील महापुजनात म्हणण्यात येणारे सर्व मंत्र हे माझ्या (प.पू.बापू) आवाजात रेकोर्ड केले जात आहेत व त्यानुसारच सर्व पुजन केले जाईल. 
अतिशय प्रेमाने माझ्या(प.पू.बापू) लेकरांसाठी माझ्या आईकडे साकडे घालतोय .त्यामुळे पुजन करताना प्रत्येकाने मनात हाच भाव ठेवा. ज्यांना रक्तदंतिकेचे पुजन करता येणे शक्य नाही त्यांनी आपले नाव, पत्ता लिहुन द्यायचे, त्यांच्या पुजनाचे पैसे माझ्याकडुन (प.पू.बापू) भरले जातील.तुम्हांला नंतर जसे शक्य होईल तसे प्रामाणिकपणे पैसे आणुन द्या.पैसे नाहीत म्हणुन पुजन नाही असे कोणाबाबतीत होता कामा नये.त्यामुळे निश्चिंतपणे प्रत्येकाने रक्तदंतिकेच्या पुजनाला बसा. ह्यात आईची स्तुती, स्तवन रुपाने मी(प.पू.बापू) स्वत: माझ्या आईला साकडे घालणार आहे. 

२) ह्या राम नवमी पासुन रेणुकामातेचे सहस्त्राधारा पुजन होणार आहे. २००१ पर्यंत आपण हे पुजन करायचो पण नंतर मी(प.पू.बापू) हे थांबवले होते. रेणूकामातेचे मुख असलेली शिळा ज्या घरात नेहमी पुजली जाते त्या घरातुन इथे रामनवमीच्या दिवशी येणार आहे.विश्वात प्रगटलेले मातेचे प्रथम रुप म्हणजे रेणूकामाता. ह्या रामवरदायिनीचे दर्शन आपल्याला ह्यापुढे नेहमी रामनवमीच्या दिवशी मिळणार आहे. 

Thursday Discourse (31-03-2011)


These are the important points summarized from Parampoojya Sadguru Shree Aniruddha Bapu’s discourse delivered on Thursday,31st March 2011 at Shree Harigurugraam. 

हरि ॐ
सद्गुरु श्री अनिरुद्ध बापूंचे प्रवचन श्री हरी गुरु ग्राम ( ३१-०३-२०११) 
आपण धात्री बघितली, आता बघायची आहे स्वाहा. हा शब्द सर्वांना अतिशय परिचीत आहे. कुठेही यज्ञ चालू  असला तर त्यातले बाकी काही नाही कळले तरी स्वाहा व नम: हे शब्द प्रत्येकाला  कळतातच. 
मातृवात्सल्यविंदानम मध्ये आपण वाचतो कि अत्री ऋषींनी यज्ञाचे  science  develop केले .त्यात यज्ञ  कुठले करायचे आणि कुठले करायचे नाही ह्या विषयी सांगितले आहे. अनसुयेने ह्या यज्ञाच्या शास्त्रालाच  आशिर्वाद देवुन सांगितले की, मी स्वाहा रुपाने यज्ञ कर्त्याच्या बाजुला नेहमी उभी असेन . 
स्वाहा म्हणजे कुठलीही क्रिया नव्हे तर स्वाहा म्हणजे साक्षात असं चैतन्य की जर आपल्याला मनापासुन आपल्या देवाला ठराविक गोष्ट  अर्पण करायची  आहे आणि ती आपल्याकडे  नाही आहे तरी देखील ते अर्पण होऊ शकते.समजा देवाला ५ मेणबत्त्या वाहायच्या आहेत, किंवा ५  पुण्यकर्मे वाहायची आहेत पण ती तुमच्याकडॆ नाहीत, तरीही परमेश्वराने तुम्हाला दिलेले चैतन्य स्वाहा शब्दाचा उच्चार करुन परमेश्वराचे स्मरण करुन अर्पण करायचे, की आपोआप ती  गोष्ट अर्पण केली जाते. 
म्हणजेच जर शून्य ग्रम  चैतन्य माझ्याकडे आहे आणि मला १० ग्रम द्यायची इच्छा आहे तर मनामध्ये त्या मुर्तीचे ध्यान करुन स्वाहा म्हटले तर तेव्हा ते १० ग्रम अर्पण केले जाते. आणि त्या व्यक्तीकडे नसतानाही  दिले गेले तरी त्याचे त्या व्यक्तीवर ऋण राहत नाही. 
हे चैतन्य म्हणजे काय ? तर रसरशीतपणा, प्रेममय जीवन. असा रसरशीतपणा, प्रेममयपणा हा तुमच्यातला परमेश्वराला सर्वात आवडणारा गुण . परमेश्वर स्वत: चैतन्यमय असल्याने  त्याला ओढ त्या चैतन्याचीच. 
चैतन्यमय जीवन म्हणजे आपण जगतो ते आयुष्य नव्हे. परमेश्वराला आवडणारे चैतन्यमय जीवन म्हणजे मनुष्य शरीर, मन व बुद्धी ह्यांची अभिव्यक्ती करायला स्वतंत्र असला पाहिजे.असे जीवन जेव्हा मी  परमात्म्याला अर्पण करतो तेव्हा ते त्याला जास्त आवडते. 
सर्व सामान्य मानव म्हणुन आपल्याकडे ही ताकद असते का? आतापर्यंत रसरशीतपणा, चैतन्यता, प्रेममयता हे सगळॆ किती काळ माझ्या संपुर्ण जीवनात होते किंवा असते? 
जीवनात प्रत्येक आनंदाच्या क्षणी आपण कोणाशी तरी तुलना करीत घालवत असल्याने त्यात रुक्षता येते. आणि परमात्म्याला ओढ असते ती स्निग्धतेची. ..

रसरशीतपणा, प्रेममयता, आनंद हे सगळॆ ज्यात आहे असे क्षण परमेश्वराला अर्पण करता आले पहिजेत . 
आपण १०० वेळा देवा तुला अर्पण करतो असे  म्हटले तरी त्यात भाव असतो का? एक महत्त्वाची गोष्ट लक्षात  ठेवा कि, काही मागण्यासाठी स्वाहा म्हणायचे नसते. स्वाहा हा उच्चार फकत देण्यासाठी असतो. स्वाहाचा खरा अर्थ समर्पित करणे. पण हे सामान्य मानवाला जमत नाही. म्हणूनच  सद्गुरु तत्वावरील पुर्ण श्रद्धेने जेव्हा सामान्य मनुष्य आपल्याकडील गोष्ट देवाला अर्पण करतो तेव्हा त्याचा तो नैवेद्य आपोआप आदिमाता स्विकारते . 
प्रत्येक वेळी स्वाहाचा उच्चार करताना आधीच्या २४ तासात तुम्ही जेव्हढा काळ चुकीचे वागला नाहीत, कुठलेही पाप केले नाही. षड्ररिपूंच्या विकारांपासुन जेव्हढा काळ तुम्ही पूर्णपणे लांब राहिलात  त्या काळाएव्हढे चैतन्य वाहीले जाते.

यज्ञात प्रथम स्वाहा म्हणताना त्याआधीच्या २४ तासात जेव्हढी तुमची श्रद्धा त्याच्या दुप्पट प्रमाणात  नेहमी  चैतन्य वाहीले जाते.दुसर्यांदा स्वाहा म्हणताना परत त्याआधीच्या २४ तासात जेव्हढी श्रद्धा त्याच्या दुप्पट प्रमाणात चैतन्य वाहीले जाते. असे प्रत्येक स्वाहाकाराच्या वेळी तुम्ही वाहीलेले चैतन्य दुप्पट्टीने वाढत जाते. ह्याचाच अर्थ अमर्याद प्रमाणात चैतन्य वाढत जाते. म्हणजेच तुम्ही रसरशीत प्रेममय नसुनही स्वाहा उच्चारातुन तुम्ही वाहीलेले चैतन्य आदिमाता दुप्पट्टीने प्रेमाने स्विकारते, असा हा स्वाहाकार. ही सोय  दत्तात्रेयांनी आणि आदिमातेने मानवासाठी का केली? ह्याचे कारण आपल्याला माहिती पाहीजे. 
यज्ञ म्हणजे काय ?तर आपला स्वत:चा देह हाच मुळ यज्ञ आहे .तुमचा भौतिक,प्राणमय व मनोमय देह हाच त्रिकुंडात्मक यज्ञ असतो. ह्या देहामध्ये जो यज्ञ चालु आहे ,त्याचा अधिष्टाता कोण?
त्याचा अधिष्टाता  आहे, वैश्वानर म्हणजेच दिव्य व पवित्र अग्नीवैश्वानर म्हणजेच मानवासाठी उत्पन्न केलेले परमात्म्याचे स्वरुप .प्रत्येक मनुष्य जन्माला येताना ह्या वैश्वानराला घेवुन येतो व प्राण सोडताना हा वैश्वानर देहातुन बाहेर पडतो.तोच ह्या यज्ञामधला अग्नी पण बनतो. हा यज्ञ अखंड्पणे  दिवस रात्र चालु असतो आणि ह्याचे फळ मिळते यजमानाला म्हणजेच तुम्हालाच. यजमानाला दक्षिणा द्यावी लागते हि दक्षिणा कुठली द्या्यची तर चैतन्याची.  हे यज्ञ कुंड आपणच शरीर,मन, प्राण ह्यांच्या प्रद्न्यापराधामुळे, आपल्या कुकर्मामुळे विध्वंस करतो.यज्ञात बाधा आणत असतो.

श्री क्रुष्णाने गीतेत सांगितले आहे की, 
” अहं वैश्‍वानरो भूत्वा प्राणिनां देहमाश्रितः । प्राणापानसमायुक्त: पचाम्यन्नं चतुर्विधम् ॥ “
‘सर्व प्रकारचे अन्न पचविण्याचे काम वैश्‍वानर अग्नी बनून मी स्वतः करतो. म्हणजे परमात्मा स्वत: माझ्या देहातील अग्नीचा अधिष्टाता आहे. तरी आपण काय करतो हा यज्ञ कुंड खराब करण्याचे काम करतो. 
आम्ही आमचा देहकुंड, प्राण, मन वारंवार भ्रष्ट करत असतो.त्याला उपाय म्हणजेच हा स्वाहाकार. अनसुया स्वरुप हे मातृ रुप आहे, हीच मुळ चैतन्यमय शक्ती आहे.म्हणुन आपल्याकडॆ चैतन्य नसतानाही ती गोड मानुन घेते. पण त्यासाठी अट एकच सद्गुरु तत्वावर पुर्ण श्रद्धा पाहीजे. 
म्हणून स्वाहाकार शब्द कानावर पडता क्षणीच इतर सर्व गोष्टी विसरुन “देवाचिये द्वारी उभा क्षण भरी” हाच भाव असायला हवा. तुम्ही म्हणाल आम्ही देवाच्या दारात तासन् तास उभे असतो.. पण आपण कसे देवाच्या दारात उभे असतो तर जोपर्यंत आपले काम होत नाही तोपर्यंत देवाकडॆ धावत बसायचे आणि काम झाल्यावर विसरुन जायचे,झोपेचे सोंग घ्यायचे. 
उभा क्षणभरी म्हणजे पुर्णपणे फक्त त्याचे होणे. असे आपण देवाच्या दारात उभे असतो का? बघा स्वाहा शब्द म्हणायला जास्तीत जास्त १ सेकंद लागतो.असा हा १ सेकंद तरी आपल्याला देवासमोर उभे राहता येते का?

” देवाचिये द्वारी उभा क्षण भरी, तेणे मुक्ती चारी साधियेल्या.” 
असे क्षणभर उभे राहिल्यावर आपोआप चारी मुक्ती मिळतील.ह्या मुक्ती कुठल्या ? नवरा म्हणेल बायकोपासुन मुक्ती मिळेल, विद्यार्थी म्हणेल शाळेपासुन मुक्ती मिळेल. नोकर म्हणेल मालकापासुन मुक्ती मिळेल. ह्या अश्या मुक्ती नव्हेत. तर ह्या चार मुक्ती म्हणजे चार पाशांपासुन मुक्ती. जे चार पाश मनुष्याला चांगल्या कार्यापासुन अडवतात अश्या पाशांपासुन मुकती. हे पाश कोणते आहेत ? ते म्हणजे-

१) देवाच्या समोर तुलना करणे.
देवाच्या प्रांगणात उभे राहुन कोणाशीही तुलना करु नका. माझी भक्ती किंवा सेवा दुसर्यापेक्शा जास्त असे कधिही म्हणु नका. बापु दुसर्याकडॆ बघुन हसले, माझ्याकडॆ नाही, दुसर्याला हात दाखवला,मला नाही दाखवला असे तुम्ही म्हणता तेव्हा तुम्हाला काय माहीत बापु कश्यासाठी दुसर्याकडॆ बघुन हसले किंवा हात दाखवला.. ते बापूलाच माहित. त्यामुळे तुम्ही तर्क करत बसु नका. एक लक्षात  ठेवा तुमच्या विचारांवर बापुचा हेतु ठरत नाही.जर अर्थ काढायचेच असतील तर ते चांगले काढा,बापुंनी कोणालाही हात दाखवला,तर तो आशिर्वादच दिला असेच समजा. असा दुसर्यांशी करत असलेल्या तुलनेचा पाश स्वाहा करता आला पाहिजे. 
२) देवादेवांमध्ये तुलना करणे.
विष्णू चांगला की शिव चांगला, लक्ष्मी चांगली की पार्वती चांगली, उजव्या सोंडेचा गणपती कडक , डाव्या  सोंडेचा गणपती नरम, सिद्धीविनायक धन,ऐश्वर्य देतो म्हणुन त्याच्या कडॆ मोठ्या रांगा, रिद्धीविनायक भक्ती देतो , ती कोणालाच नको असते त्यामुळॆ त्याच्याकडॆ कोणीच जात नाही. अश्या प्रकारची देवादेवांमधील तुलना करु नका. आपला बाप तो आपला बाप एव्हढेच लक्षात ठेवा. 
३) देव आणि गुरु ह्यांची तुलना करणे.
नेहमी गुरु निवडताना पवित्र गोष्टच निवडा. समजा उद्या डुक्कराची विष्ठा आणुन त्याला गुरु म्हणुन पुजायला गेलात तर ते गुरु होणार का? नक्कीच नाही. जर मनुष्याला गुरु मानायचे नसेल तर ग्रंथाना गुरु माना. 
 कलियुगात प्रत्येक गल्लीत अनंत कोटी ब्रम्हांड नायक झाले आहेत.ह्याचे कारण आपण मातृवात्सल्यविंदानम मध्ये वाचतो. त्यात कलीने स्पष्ट सांगितले आहे, की त्याला ढोंगी यतीच प्रिय आहेत, त्यामुळे त्यांचीच सर्वत्र चलती आहे. 
सद्गुरु तत्त्व व परमात्मा ह्यांच्यात कधीच भेद मानता कामा नये. तिथे आपला भेदाभेद (भेद व अभेद दोन्ही एकत्र) भाव असला पाहिजे. भेदाभेद म्हणजेच सद्गुरुंचे पुजन करताना परमात्मा व सद्गुरु हे एकच आहेत हा भाव ठेवणे म्हणजे अभेद व सद्गुरुंची सेवा करताना सद्गुरु हे मानव आहेत असे मानून सेवा करणे  हा भाव म्हणजे भेद. 
हा भेदाभेद कसा असतो ते साईसच्चरितातील कथांवरुन लकशात येते. जेव्हा बाबांचा हात भाजल्याची बातमी चांदोरकरांना कळते तेव्हा ते नुकतेच जेवायला बसलेले असतात तरी ते जेवण तसेच सोडुन लगेच  त्याकाळातील प्रसिद्ध डॉक्टर परमानंद ह्यांना घेवुन शिर्डित येतात.बाबा त्या डॉक्टरांकडुन उपचार करुन घेणार नाही हे माहित असुनही त्या डॉक्टरांना नाना शिर्डित १० दिवस थांबवुन ठेवतात, त्यांची त्या काळात एका दिवसाची फी १००० रुपये होती ती सुद्धा नानांच देतात. इथे नानांनी हा विचार नाही केला की बाबा तर साक्षात  परमात्मा आहेत त्यांना काय गरज आहे डॉक्टरची? बाबांच्या चालण्याच्या वाटेवरील काटे, दगड नेहमी नेवासकर बाजुला काढत का ? तर बाबांना लागु नये म्हणुन. बाबांना पिठ दळताना बघुन चार बायका धावुन येतात व स्वत: दळु लागतात , बाबांना त्रास होऊ नये म्हणुन .. 
म्हणजे पुजा करताना जरी ह्या सर्व भक्तांचा बाबा म्हणजेच देव हा भाव असला तरी देखील सेवा करताना बाबा माणुस आहेत त्यांना त्रास होऊ नये म्हणुनच ते सतत काळजी घेताना दिसतात. हा भेदाभेद भाव . 
आपण काय करतो तर पुजन करताना भेद करतो म्हणजे सद्गुरुंना मानव समजतो, गुरुला काय कळते आहे कसेही केले तरी चालेल हा भाव असतो तर सेवा करताना अभेद मानतो म्हणजे त्यांना देव समजतो, म्हणजे देवासमोर त्याला मी सेवा करताना दिसेन अशी सेवा करायला धडपडतो. आम्ही आमच्या सोयीनुसार आम्हांला पाहिजे तेव्हा भेद मिटवतो व आम्हांला पाहिजे तेव्हा अभेद ठरवतो. 
सेवा करताना कसे वागायचे ते साईसच्चरितात २३ व्या अध्यायात स्पष्ट सांगितले आहे की,
 “गुर्वाज्ञा जेथे स्पष्ट युक्तायुक्त वा  इष्टानिष्ट , हे विचारी तो शिष्य नष्ट”
बोकड कापायचा आहे मग कापायचाच आहे , सर्पदंश झाला तरी बाबांना सोडुन कुठेही जाणार नाही मग जीव गेला तरी चालेल हा भाव म्हणजे भेदाभेद. 
४) शेवटचा पाश म्हणजे मी आणि माझा सद्गुरु ह्यांच्यामध्ये तुलना करणे.
स्वत:च्या आयुष्यात जरा बघा की तुम्ही किती वेळा सद्गुरुंची परीक्षा घेत असता? तुमच्या परीक्षेत  सद्गुरु pass झाले तर तो सद्गुरु चांगला जर fail झाला तर तो सद्गुरु बाद. मग दुसर्या सद्गुरुकडे धाव. 
हा सद्गुरु माझा आहे व तो माझ्यासाठी जे श्रेयस्कर तेच देणारा आहे हा भाव आपण किती जण ठेवतो ?  बापुंना सांगितले पण बापु माझे कामच करत नाहीत.. अश्या प्रकारची सद्गुरुंची परीक्षा घेणे थांबवा .
हे जे चार पाश आहेत ते तुम्हांला जीवनात यशापासुन लांब करतात.अश्या ह्या चार पाशांचे बंध जिने पुर्णपणे तोडुन टाकले ती म्हणजे मीनावैनी. मीनावैनीवरिल documentry video चे काम होत आले आहे.लवकरच सगळयांना हा video पहायलाही मिळेल.तिला ज्या दिवशी तिचा देव गवसला त्या दिवशी ती पुर्णपणे स्वाहाकार झाली. 


जेव्हढ्या प्रमाणात तुम्ही मनापासून मंत्र म्हणता तेव्हढ्या प्रमाणात हे चार पाश ढिले होत असतात.एक  लक्षात ठेवा सद्गुरूंनी दिलेला मंत्र हा नेहमी  स्वाहाकार मंत्र असतो. हे चार पाश ढिले झाल्याशिवाय बंधनातून मुक्तता होऊ शकत नाही.
बंधन म्हणजे काय ? तर स्वतःचे घर आहे पण त्यात  राहता येत नाहे, अन्न आहे पण खाता येत नाही ही बंधनेच आहेत.  म्हणून ह्या चार पाशांपासून मुक्तता व्हायला पाहिजे आणि ही  मुक्तता कोण करते?  तर साक्षात अनसूया .