श्री अनिरुद्ध गुरुक्षेत्रम..विश्वातील सर्वश्रेष्ठ तीर्थक्षेत्र


श्री अनिरुद्ध गुरुक्षेत्रम म्हणजे पापांची निवृती करणारं, पापाबद्दल क्षमा करणारं, पुण्याची वृद्धी करणारं, परमात्म्याची प्राप्ती करुन देणारे, गुरुचरणी भाव वाढविणार आणि मला पुरुषार्थी बनविणारं विश्वातील एकमेव अद्वितीय तीर्थक्षेत्र.

श्री अनिरुद्ध गुरुक्षेत्रम असे तीर्थक्षेत्र आहे की जेथे श्रद्धावान आहे, त्या प्रत्येक श्रद्धावानाच्या ठिकाणी, त्याच्या आजुबाजूला ह्या अनिरुद्ध गुरुक्षेत्रमचा प्रभाव आहे, अगदी प्रलयापर्यंत.

श्री अनिरुद्ध गुरुक्षेत्रम विश्वातील एकमेव अद्वितीय तीर्थक्षेत्र का?

१) श्री अनिरुद्धांचे पंचगुरु म्हणजेच श्री दत्तगुरु, श्री गायत्री माता, श्रीराम, हनुमंत व साईनाथ ह्यांचे निवासस्थान आहे ते याच तीर्थक्षेत्री.

२) गायत्री मातेने नवअंकूर ऎश्वर्य प्रदान करुन सिद्ध केलेले प्रणव स्वरुप प. पू. श्री अनिरुद्ध बापू, प. पू. श्री नंदाई व प. पू. सुचितदादा यांचे प्रत्यक्ष वास्तव्य याच तीर्थक्षेत्री असून त्यांच्या प्रत्यक्ष दर्शनाचा व चरणमुद्रांच्या दर्शनाचा लाभ भक्तास होतो तो याच तीर्थक्षेत्री.

३) “मी तुला कधीच टाकणार नाही” या सद्गुरु श्री अनिरुद्धांच्या कृपावचनामुळे प्रत्येक भक्ताचा अनिरुद्ध चरणांशी श्रद्धायुक्त गुरुभाव दृढ होतो, तो याच तीर्थक्षेत्री.

४) अकारण कारुण्य, क्षमा व माझ्या अनन्य भक्तीची स्विकृती करून माझ्या परिश्रमाला, कुवतीला व क्षमतेला सातत्याने बल, भक्ती आदी ९ ऎश्वर्य पुरविणारे, माझ्या हक्कचे व प्रेमाचे स्थान म्हणजेच धर्मासन अर्थात धर्माचे आसन व पावित्र्याचे अधिष्ठान असलेला साक्षात माझा बापू श्री अनिरुद्ध, त्याच्या धर्मासनाचे दर्शन होते. तेही याच तीर्थक्षेत्रात.

५) नित्य आरती, जप, उपासना, विष्णू सहस्त्र नाम इत्यादी भावपूर्ण दैनंदिन कार्यक्रमाबरोबर “श्रीरामरसायन”, “मातृवात्सल्यविंदानम” या ग्रंथांच्या नित्य पठ्णामुळे माझ्यातील भक्तीभाव सहज प्रकट होऊन भाववृद्धी होते ती याच तीर्थक्षेत्री.

६) सद्गुरु श्री अनिरुद्धांच्या संकल्प शक्तीतून प्रकटलेल्या एकमेव अद्वितीय अशी “त्रिविक्रमाचे” प्रत्यक्ष दर्शन घडते ते याच तीर्थक्षेत्रात.

७) प्रणवस्वरुप श्री अनिरुद्धांच्या प्रेमाच अखंड स्त्रोत त्यांच्य सगुण साकार रुपामुळे मला प्राप्त होतो तो याच तीर्थक्षेत्रात.

८) ज्याचा मुळ गुणधर्म श्रद्धावानांना क्षमा करणे आहे. त्या श्रीमद पुरुषार्थ पुरुषोत्तम यंत्राचे प्रत्यक्ष दर्शन होते ते ही याच गुरुक्षेत्रात.

९) आदीमाता गायत्री, तिच्या महिषासुरमर्दीनी अशा सुक्ष्म रुपात प्रकटली आहे ती याच तीर्थक्षेत्रात. त्या महिषासुरमर्दीनीचे व “घंटा” रुपात असलेल्या तिच्या अस्त्राचे दर्शन होते ते याच गुरुक्षेत्रात.

१०) पृथ्वीला धारण करणारे काळ्यापाठीचे कूर्म श्रद्धावानांना विश्वात कुठेही गेलात तरी गुरुक्षेत्रम्शी कायम जोडून ठेवणारे आहे. त्या काळ्यापाठीच्या कूर्माचे दर्शन होते. ते ही याच तीर्थक्षेत्रात.

ज्याक्षणी मी माझं नातं गुरुक्षेत्रमशी दृढ करतो, त्या क्षणी मला सद्गुरु श्री अनिरुद्धांच्या कृपाप्रसादाच सहज लाभ प्राप्त होतोच. तसेच जेव्हा मी गुरुक्षेत्रमला वारंवार येत राहतो. तेव्हा मला सर्व १०८ तीर्थक्षेत्रांचे दर्शन केल्याचे पुण्यही मिळतेच व त्याचबरोबर माझ्या पापांचे/चुकांचे क्षालन होते. म्हणून माझ्यावर नित्य कृपा करणार्या प्रणव स्वरुप श्री अनिरुद्धानां प्रार्थना करुया की….

“हे सद्गुरुराया, तू माझा आधारस्तंभ आहेस, वात्सल्यपिता आहेस आणि रक्षक बंधू म्हणून माझे कवच ही आहे। म्हणून हे देवाधिदेवा अनिरुद्ध, तू माझे अद्न्यान दुर करून माझा पुरुषार्थ सिद्ध कर, माझ्या जीवनाचे गोकुळ कर, माझ्या कुटुंबाचे रक्षण कर. तू माझ्यासाठी केलेला प्रत्येक संकल्प माझ्या उद्धारासाठीच आहे म्हणून हे गुरुराया तुझ्या चरणांजवळ राहून मी विनम्रपणे तुझ्या सर्व नियमांनी स्वतःला बांधून घेत आहे.”


“मी विनम्रपणे तुझ्या सर्व नियमांनी स्वतःला बांधून घेत आहे.”

—- (श्री अनिरुद्ध गुरुक्षेत्रम येथे दिलेली माहिती)

Leave a comment